esakal | किनवटमधील खराब रस्त्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू; जगदंबा तांड्यावरील दूर्दैवी घटना   

बोलून बातमी शोधा

file photo}

खासदार हेमंत पाटील यांना समजल्यानंतर त्यांना गहिवरुन आले. त्यांनी तात्काळ त्याठिकाणी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले

nanded
किनवटमधील खराब रस्त्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू; जगदंबा तांड्यावरील दूर्दैवी घटना   
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा येथील गर्भवती महिलेची प्रसूतीची व्यथा आणि त्यानंतर नवजात बाळाचा झालेला मृत्यू हे खासदार हेमंत पाटील यांना समजल्यानंतर त्यांना गहिवरुन आले. त्यांनी तात्काळ त्याठिकाणी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले तसेच तांड्यावरील समस्या जाणून घेऊन, घाट रस्ते दुरुस्ती आणि इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले. 

किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा येथील मन हेलावून सोडणाऱ्या घटनेने आरोग्य आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. ता. १७ फेब्रुवारी रोजी येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असल्यामुळे रुग्णालयात घेऊन जायचे होते. परंतु रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेअभावी महिलेला नातेवाईकांनी बैलगाडीने रुग्णालयात घेऊन गेले. किनवट ते जगदंबा तांडा दरम्यानचा रस्ता दगड- गोट्याचा कच्चा असल्यामुळे महिलेची परिस्थिती नाजूक झाली. पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे नेण्यात आले. परंतु या दरम्यान रस्त्यामुळे महिलेला झालेल्या त्रासाने बाळाचा पोटातच मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणून महिलेला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

दुचाकीवरुन प्रवास करत त्यांनी जगदंबा तांड्याला भेट

ही घटना खरंच मन हेलावून टाकणारी आणि आजच्या व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. रस्त्याअभावी एका नवजात जीवाला मुकावे लागले. दरम्यान खासदार पाटील किनवट- माहूर दौऱ्यावर असताना या घटनेची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जगदंबा तांडा येथे जाऊन कुटुंबाची भेट घेण्याघेतली. दुचाकीवरुन प्रवास करत त्यांनी जगदंबा तांड्याला भेट दिली आणि ज्या परिवारासोबत ही घटना घडली त्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी तांडा वासियांच्या समस्या जाणून घेतल्या व सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच या भागात असलेले घाट रस्ते आणि इतर समस्या सोडविण्याकडे लक्ष देणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.