Prices Range Between ₹70,000–₹1,00,000: पेरणीच्या हंगामापूर्वी बैलजोड्यांची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. बाजारात ७० हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत भाव दिसत आहेत.
किनवट: वाढत्या उन्हाच्या झळांदरम्यानही ग्रामीण भागात शेतकरी आगामी हंगाम लक्षात घेऊन मशागतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारीला लागले आहेत. बाजारांमध्ये बैलजोड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.