तडे गेलेल्या ठिकाणी मलमपट्टी

प्रभाकर दहिभाते
Wednesday, 11 November 2020

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढील कित्येक वर्षांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी असलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हदगाव तालुक्यातुन जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गुजरात येथील सदभाव कंपनीने बरडशेवाळा येथे आपले बस्तान मांडले आहे. कामासाठी विविध राज्यांतील ठेकेदारांच्या माध्यमातून काम करत असताना कामाची सुरवात आणि दर्जा हा अडाणी माणसालाही कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे दाखवु लागला. 

बरडशेवाळा, (ता.हदगाव, जि. नांदेड)ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढील कित्येक वर्षांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी असलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हदगाव तालुक्यातुन जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गुजरात येथील सदभाव कंपनीने बरडशेवाळा येथे आपले बस्तान मांडले आहे. कामासाठी विविध राज्यांतील ठेकेदारांच्या माध्यमातून काम करत असताना कामाची सुरवात आणि दर्जा हा अडाणी माणसालाही कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे दाखवु लागला.

 हेही वाचा -  माहूरजवळ एसटी बस व ट्रकचा अपघात ; ४३ प्रवासी जखमी

मालक दिल्लीत व कंपनी गल्लीत 
वारंगा ते हदगाव दरम्यान सुरू असलेले काम पहिल्या टप्प्यात मोठ्या जलदगतीने करण्यात आले. कामाचे नियोजन देखरेखीसाठी कंपनीचेच इंजीनियर असल्याने सर्व सामान्य माणसाच्या डोक्याच्या वरचा भाग ठरला आहे. कामात मालक दिल्लीत व कंपनी गल्लीत असे सर्व नियोजन बिघडत गेल्याने कामाचा दर्जा खालावला गेला आहे. कोणतीच एक बाजू पूर्ण झाली नसून काम पूर्ण करण्याचा अवधी संपला तरी काम ठिक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून कित्येकांना आपला जीव गमावला लागला आहे. 

उद्‍घाटनाच्या अगोदरच तडे गेले 
वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असून कोट्यवधी रुपये खर्च करून कित्येक वर्षांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी असलेल्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट रस्त्याला हदगाव ते वांरगा रोडवर ठिक ठिकाणी उद्‍घाटनाच्या अगोदरच तडे गेले आहेत. कित्येक वर्षांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्गावर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. 

लक्ष देण्याची गरज 
बातमीने संबंधित विभागाला जाग आली असल्याने तडे गेलेल्या ठिकाणी मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले आहे. पण राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून कित्येक वर्षांच्या दळणवळणाच्या सुविधेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे हदगाव तालुक्यातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandage on the affected area