esakal | खरीप पिक कर्ज वाटपात ही बॅँक ठरली अव्वल...
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अव्वल ठरली आहे. यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेने २४० कोटींचे पिककर्जाचे वाटप केले आहे. 

 

खरीप पिक कर्ज वाटपात ही बॅँक ठरली अव्वल...

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अव्वल ठरली आहे. गेल्या दोन महिण्याच्या कालावधीत बँकेने २४० कोटी ४१ लाख ९९ हजारांचे पिक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे डॉ. अजय कदम यांनी दिली. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेने लॉकडाउनच्या काळात देखील शेतकऱ्यांना पीककर्ज असो वा शासनाचे अनुदान शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेत कमीत कमी कर्मचारी असतानादेखील त्यांना शेतकऱ्यांच्या गावात जाऊन पीककर्ज, शासनाचे अनुदान वाटप करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. एक एप्रिल २०२० ते २६ जून २०२० अखेर ४० हजार २६७ अल्पभूधारक शेतकरी १८० कोटी ४३ लाख ३३ हजार तर पन्नास हजार ८११ बहुभुधारक शेतकऱ्यांना ५९ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपयांचे खरीप पिक कर्जापोटी एकूण २४० कोटी ४१ लाख ९९ हजार रुपये इतकी रक्कम वाटप केली आहे.

हेही वाचा - माझा सर्वात महत्वाचा गुरू म्हणजे आई - विजयकुमार मगर

तालुकानिहाय आकडेवारी 
हदगाव तालुक्यातील सर्वाधिक नऊ हजार ८३४ शेतकऱ्यांनी, मुखेड तालुक्यातील सात हजार ४२७, कंधार तालुक्यातील सहा हजार ४०३, नायगाव पाच हजार ३०४ शेतकऱ्यांना या खरीप पिक कर्जाचा लाभ घेण्यात ही तालुके सर्वात पुढे आहेत. त्या खालोखाल,  नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, बिलोली, धर्माबाद, देगलुर, भोकर, उमरी, हिमायतनगर, किनवट, माहुर या तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात पिक कर्जाचा लाभ मिळाला आहे. 

हेही वाचा - मातृत्व वंदना योजनेचा ४५ हजार महिलांना लाभ ​

सर्वाधिक खरीप पिक कर्जाचे वाटप 

लिड बँक इतर बँकांच्या तुलनेत यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेले खरीप कर्ज वाटप सर्वात जास्त असल्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सर्वाधिक खरीप पिक कर्जाचे वाटप करणारी जिल्ह्यातील पहिली बँक ठरली आहे.

पीककर्ज वाटपात बॅँक अव्वल 
जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच ग्राहकांच्या विश्‍वासास पात्र ठरत आली आहे. लॉकडाउनच्या काळात जिल्हा बँकेच्या कामकाजाकडे सामान्य शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. शासनाचे सर्व नियम पाळत कमीत कमी मनुष्यबळाच्या जोरावर बँकेने पिक कर्जवाटपात जिल्ह्यात अव्वल क्रमांक दर्जाचे काम केले आहे.

-अजय कदम (कार्यकारी अधिकारी)