बार्टीचे नवीन नियम अनुसूचित जाती संवर्गतील यूपीएससी मुख्य परीक्षार्थ्यांच्या मुळावर- दीपक कदम

प्रल्हाद कांबळे
Sunday, 22 November 2020

नियम बदलून विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. नवीन जाहिरातीतील फक्त नियम क्रमांक चार पूर्वीच्या वर्षीही लागू होता.

नांदेड : यूपीएससी परीक्षेच्या निकालानंतर तब्बल एक महिना पाठपुरावा केल्यानंतर शेवटी परवा बार्टी पुणे यांच्यातर्फे अनुसूचित जाती यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा तयारीसाठी 50 हजार रुपये शिष्यवृत्ती योजना जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पण 2018- 19 यापूर्वी दोन वर्षी ज्या नियम व अटी होत्या त्यात बदल केल्यामुळे 2020 साली विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे अशक्य झाले आहे.

नियम बदलून विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. नवीन जाहिरातीतील फक्त नियम क्रमांक चार पूर्वीच्या वर्षीही लागू होता. यावर्षी नवीन पाच नियमात भर टाकून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित करण्यात आले आहे. पूर्वीच्याच नियमानुसार याही वर्षी आर्थिक मदत द्यावी व परिपत्रकाच्या नियमात सुधारणा करावी. अन्यथा या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही. व ही योजना केवळ दिखावा होईल.

हेही वाचानांदेड जिल्ह्यात पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना करावी लागतेय कसरत -

यूपीएससी परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी किमान दोन वेळा तरी ही मदत द्यावी. यशदा किंवा दिल्ली इतर केंद्राची मदत विद्यार्थी घेतातच. ही पूर्वपरीक्षेसाठी मदत मिळते पण मुख्य परीक्षेसाठी अटी न टाकता सर्व विद्यार्थ्यांना मदत द्यावी. दिल्लीमध्ये बार्टी मदत पूर्व परीक्षेपर्यंत मिळत असते. मुख्य परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना पुन्हा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. यामुळे पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यात ही मदत द्यावी. विद्यार्थ्यी, पालकांमार्फत शासनास वरील मागण्या करण्यात येत आहेत. सुधारित नियम करुन अनुसूचित जाती यूपीएससी मुख्य परीक्षा परीक्षार्थीना आर्थिक लाभ वंचित करण्याच्या नियमावली दुरुस्त करुन 2018- 19 सालच्या नियमानुसार मदत द्यावी अशी मागणी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barty's new rules are at the root of the UPSC main candidates in the Scheduled Caste category Deepak Kadam nanded news