

Nanded Barul Fish Seed Center Closed
esakal
कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मानार प्रकल्प परिसरात १९६८ मध्ये सुरू करण्यात आलेले मत्स्यबीज उत्पादन केंद्र गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. एकेकाळी जिल्ह्यातील महत्त्वाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र म्हणून ओळख असलेल्या या केंद्राची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना याचा फटका बसत आहे.