नांदेड- मा.क.प.च्या आंदोलनाला यश ! चार वेळा दिला लढा

On behalf of the Marxist Communist Party, four agitations have taken place in front of the District Collector's office in Nanded during the lockdown..jpg
On behalf of the Marxist Communist Party, four agitations have taken place in front of the District Collector's office in Nanded during the lockdown..jpg
Updated on

नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लॉकडाऊन काळात स्थानिक प्रश्न घेऊन चार आंदोलने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर केली आहेत. त्यामध्ये ख्रिश्चन दफन भूमी, पिडित अल्का राजीव गुल्हाने मंजूर मावेजा अदा करणे व बजरंग कॉलनी येथील दलित लोकांच्या घरासमोर रस्ता, नाली, ड्रेनेज व नागरी सुविधा पुरविणे अशी प्रकरणे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कारवाई करावी असे महापालिकेस आदेश दिले होते. परंतु महापालिकेच्या पद्धतीनुसार संबंधित विभागास पत्र काढून वेळ मारून नेण्याचे व अर्जदारास कळविण्याची पध्दत पाहता तसेच या संदर्भात देखील केले आहे.

माध्यमातून सर्वच प्रमुख वृतपत्रात बातम्या येऊन सुद्धा दखल घेण्यास संबंधित सहाय्यक आयुक्त तयार नव्हते. शेवटी (ता. ५) नोव्हेंबरपासून आमरण उपोषण व बेमुद्दत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मा.क.प. शहर समितीने घेतला व रीतसर नोटीस देऊन ७० ते ८० कार्यकर्ते महापालिकेसमोर आंदोलन करण्यासाठी जमले होते. परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्यामुळे आणि अचारसंहिता लागू झाल्यामुळे वजिराबाद पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक संदिप शिवले यांनी आंदोलन न करता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले व उपायुक्त बीकड सोबत निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि काही महत्वपूर्ण तात्काळ निकाली निघालेत.
 
ख्रिश्चन दफनभूमीच्या संदर्भातील मुख्य मागण्या साफ सफाई, वीज पुरवठा, पाणी, अंतर्गत रस्ते, शेड निर्माण करणे या सोडविण्यात येतील असे म्हणाले व सहाय्यक आयुक्त सादेक यांना तशा सुचना दिल्या व तुम्ही पत्र काढून विसर का पडला असे विचारले. उद्या काम सुरू करतो. म्हणून सादेक यांनी विषय संपविला आणि (ता. ६) नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता दफनभूमीतील साफ सफाई करण्यास सुरवात केली आहे. वयोवृध्द गुल्हाने दांपत्य महापालिकेचा मंजूर झालेला मावेजा मिळावा म्हणून अनेक वर्षापासून खेटे मारत असून त्यांच्या खात्यावर देखील आजच पैसे टाकणार असल्याचे मान्य केले आहे. 

एम.जी.एम.कॉलेज समोरील बजरंग कॉलनी येथे मारूती मंदिर ते प्रियदर्शनी शाळा येथे दलित कुटुंबियांची घरे असून जाणीवपूर्वक तेथे ५० मिटर रस्ता तयार केला नाही. ड्रेनेज लाईन टाकण्यात आली नाही. नाली व इतर नागरी सुविधा पुरविल्या नाहीत. तेथील नागरिकांनी म.न.पा.समोर उपोषण व आंदोलने केली आहेत, परंतु दुर्लक्ष केले आहे. आता तातडीने सर्व सुविधा पुरविल्या जातील, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. पत्र काढून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला तर माकपा तीव्र आंदोलन करेल असा सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सुचक इशारा प्रशासनास दिला आहे. समिराबाग ख्रिश्चन दफन भूमीचे काम तात्काळ सुरू केले असून एकंदरीतच मा.क.प.च्या आंदोलनाला यश आले आहे.

आंदोलने यशस्वी करण्यासाठी कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.मारूती केंद्र, कॉ.रविंद्र जाधव, सॕम्युअल नागुरे, आनंद माने, जेम्स स्वामी, लक्ष्मीबाई दर्शनवाड, आकाश माने, स्वामीदास बेदरे, पांडुरंग वाहुळे, पूजा वाघमारे, पंचफुला संगे, अंजनबाई नामेवाड, माधवी गायकवाड, प्रीती वेलूरकर, निर्मलाबाई माळेवार, माधव संगे आदींनी परिश्रम घेतले. तीनही प्रकरणात महापालिकेने चालढकल केल्यास तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com