esakal | नांदेडकरांनो सावधान : जिल्ह्यात 106 पोलिसांना कोरोनाची बाधा; अनेकांनी केली मात

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यातील १०६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलिसांचा समावेश आहे. यापैकी अनेकांनी यावर मात करुन आपल्या सेवेत दाखल झाले आहेत.

नांदेडकरांनो सावधान : जिल्ह्यात 106 पोलिसांना कोरोनाची बाधा; अनेकांनी केली मात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या संसंर्गाने संबंध जगाला वेठीस धरले आहे. पहिल्या लाटेत सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यावर नियंत्रण मिळते न मिळते तोडदुसरी लाट पसरली. ही लाट गंभीर असून काळजी घएणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील परिस्थिती अत्ंयत नाजूक झाली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस व आरोग्य विभाग सतत प्रयत्न करत आहे. मात्र फ्रन्ट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना याचा सर्वाधीक फटका बसत आहे. जिल्ह्यातील १०६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलिसांचा समावेश आहे. यापैकी अनेकांनी यावर मात करुन आपल्या सेवेत दाखल झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 19 पोलिस अधिकारी आणि 87 पोलिस अमलदार असे 106 पोलिस कोरोना बाधीत आहेत. यामुळे पोलिस विभागावर कामाचा वाढलेला ताण लक्षात येतो. नांदेड जिल्ह्यासह देशात कोरोना पसरत आहे. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये कहर माजविला आहे. नांदेड जिल्ह्यात मागील एक एप्रिलपासून दररोज हजार पेक्षा जास्त नवीन कोरणा रुग्ण सापडत आहेत. 11 एप्रिल रोजी एक हजार 959 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्यासुद्धा भरपूर वाढली आहे.

हेही वाचा - परभणी मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा बँकेचे ग्राहक, शेतकऱ्यांची गैरसोय

वैद्यकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. तरीपण कोरोना आटोक्यात येत नाही. कायदे तयार केले जात आहेत, ते कायदे अंमलबजावणी करावी असे आदेश निघतात आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस विभागावर असते. पोलिससुद्धा आपल्या कुटुंबाची काळजी करत जनतेने कोविड नियमावलीनुसार आपले कामकाज करावे. 

ता. 12 एप्रिल रोजी घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 19 पोलीस अधिकारी आणि 87 पोलीस अमलदार कोरोना बाधित आहेत. त्यामुळे पोलिसांच्या दररोजच्या कामकाजात अनेक व्यत्यय येत आहे. अशा परिस्थितीतसुद्धा पोलिस आपल्या कामात मागे राहत नाहीत. सर्वात मोठी बाब म्हणजे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यासह अनेक पोलिस निरीक्षक कोरोना बाधित झाले. या अधिकाऱ्यांनी करोनावर मात करत पुन्हा नांदेडकरांच्या सेवेत रस्त्यालवर उतरले आहेत. नांदेडकरांनी सर्व प्रशासनास मदत करावी आणि कोवीडच्या नियमानुसार आपले कामकाज करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहेत.