पोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान 

File photo
File photo

नांदेड :  कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलिसांना अनेकदा नदीत तलावात, विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढावे लागते. अशावेळी पोलिस यंत्रणा स्थानिक मासेमार बांधवांची मदत घेते. कारण मासेमार कुठल्याही ठिकाणी पोहण्यात आणि मृतदेह शोधून काढण्यात तरबेज असतात. 
 
महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल. 

महाराष्ट्रात १० पोलिस आयुक्तालय आणि ३६ पोलिस अधीक्षक कार्यालय कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस दलात आजच्या घटकेला सुमारे एक लाख ८४ हजार ७४५ कर्मचारी आहेत. तीन हजार ५३० पोलिस निरीक्षक आहेत. चार हजार ५३० सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. सात हजार ६०१ पोलिस उपनिरीक्षक आहेत. सुमारे २५० भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. २७७ पोलिस अधीक्षक आहेत. ६५२ पोलिस उपअधीक्षक आहेत. एवढ्या मोठ्या पोलीस दलात आपत्ती व्यवस्थापनातही निपूण अशा कर्मचाऱ्यांची भरती होणे अनिवार्य नव्हे, काळाची गरज आहे. 

महापुरात पाण्याच्या ठिकाणी भोई समाजातील किंवा ज्यांनी लहानपणी मासेमारीच्या माध्यमाने पाण्यात पोहण्याची कला आत्मसात केली. त्या भोई समाजातील मुलांची मदत एखाद्या पीडिताला वाचविण्यासाठी होईल किंवा मृतदेह काढण्यासाठीही त्यांची मदत होईल, असे अनेक दुरोगामी लाभ पोलिस दलात भरती झालेल्या भोई उमेदवाराकडून होतील. 

दरम्यान जलतरणपटू अनेक असतात, पण मासेमार बांधव आपल्या मुलांना पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवायचे , एखाद्याचा मृतदेह नेमका कसा बाहेर आणायचा, याचेही शास्त्रशुद्ध शिक्षण बाळकडूच्या देतच असतात. ती पारंपरिक कला लक्षात घेता भोई समाजातील योग्य उमेदवारांना भरतीत स्थान दिल्यास आपली पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.   

आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीत काही पदावर निवडक जलतरणपटूंची प्राधान्याने निवड केल्यास पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनाही पाठविलेले आहे. 
- दादासाहेब वलथरे, भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com