विकत पाणी घेणं परवडत नाही साहेब..!

भोकर तालुक्यात वाडी-तांडे तहानलेले : पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे
water scarcity bhokar
water scarcity bhokarsakal

भोकर : तालुक्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो. योग्य अंमलबजावणी होत नसल्याने जनतेला घडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सध्या ‘सूर्यनारायण’ कोपल्यान अंगाची लाहिलाही होत असून दुसरीकडे ग्रामीण भागातील वाडीतांड्यावर ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. सरकार मायबाप पाण्यावर पैका-आडका खर्च करीत आहे तरी घसा कोरडाच हाय..आम्ही किती दिवस ईकत पाणी घ्यावं..परवडत नाही साहेब. अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.

तालुक्यात मोठा जलाशयसाठा असलेला प्रकल्प नसल्याने इथल्या मातीत ओलावा क्वचित पाहयला मिळतो आहे. मोजक्याच गावात ‘गाव तलाव’ असले तरी त्यात फार काळ पाणी टिकून राहत नाही. विहिरी, नदी, नाले ऐन उन्हाळ्यात कोरडेठाक पडतात. याची दखल घेऊन माजी मंत्री डॉ. माधवराव कीन्हाळकर यांनी सुधाप्रकल्पाची निर्मिती केल्याने त्या परिसरातील जमिनीत ओलावा तग धरून आहे. इतर ठिकाणी मात्र आजही शेती, पडीक जमिन, वनसंपदा पाण्यासाठी आसुसलेली आहे. अशा बिकट परिस्थितीचा सामना येथील जनता करिता असताना जलक्रांतीचे अधुरेच राहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाची धुरा खांद्यावर घेतली आहे. शहरातील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्याने पाणी प्रश्न मिटला आहे. तालुक्यातील सिंचनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. यात प्रामुख्याने सूधा प्रकल्पाची उंची वाढवीणे, पिंपळढव तलाव, काळढोह तलावासह अन्य वीस पंचवीस तलाव निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मुळे आता भोकरकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. गुरा-ढोरांना पाणी, वैरण, ओलीताखाली शेती येणार असल्याने तालुका सुजलाम सुफलाम होणार असल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा मात्र उन्हाळ्याच्या मध्यानातच सुर्य आग ओकत असल्याने जीव कासावीस झाला आहे. ग्रामीण भागातील वाडीतांड्यावर ग्रामस्थांना घडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

वाडी-तांड्यावर टंचाई

तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली असली तरी बरीच कामे ठप्प झाली आहेत. टंचाई आराखडा कोटित असला तरी योग्य अंमलबजावणी होत नाही. शहरातील पाणी प्रश्न मिटला पण खेडोपाडी विशेषतः वाडीतांड्यावर आजही ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे दिसून येत आहे. दिवशी खुर्द (ता.भोकर) येथे मागील विस वर्षापासून पाणी पुरवठा योजना नसल्याने ग्रामस्थ लगत असलेल्या नदी, तांड्यातील विंधन विहिरीवर तहान भागवत आहेत. भुगर्भातील पाणी पातळी कमी झाली की विंधन विहिर बंद पडते. पुन्हा पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

दिवशी खुर्द येथील तांड्यावर गेली अनेक वर्षांपासून टंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पुढारी इकडे कानाडोळा करीत आहेत. अनेकदा लेखी तक्रार केली तरी घाम फुटला नाही. तांड्यावर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली तर टंचाई निर्माण होणार नाही. शासनाने पुढाकार घेऊन होणारी गैरसोय दूर करावी.

- गंगाधर महादवाड, माजी सरपंच तथा चेअरमन, दिवशी.

तालुक्यात सध्या तरी टंचाई नाही पण एप्रिल व मे महिन्यात तशी शक्यता आहे. ४२ विंधन विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे. पाणी विकत घेत असतील तर संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करून जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

- राजेश लांडगे, तहसीलदार, भोकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com