esakal | नांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात आली. लॉकडाउन उघडल्याने दुकानदार, व्यवसायीक, उद्योजक इतकेच नव्हे तर मल्टी सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल आनंदाच्या भरात स्वतःची व इतरांची सुरक्षा घेणेच विसरुन गेले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांनी नवी उंची गाठली आहे. 

नांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड :  मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. १२९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

सहा महिण्यांपासून लॉकडाउनचे काउंटडाऊन सुरुच आहे. मात्र मागील काही दिवसांपासून जिवनमान पूर्व पदावर यावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळेच लॉकडाउनमध्ये बऱ्यापैकी शिथीलता देण्यात आली. मात्र अनेकांनी गैरफायदा घेणे सुरू केले आहे. अनेकजण विनामास्क फिरत आहेत. दुसरीकडे लहान मोठे दुकानदार, व्यवसायिक, उद्योजक इतकेच काय अनेक रुग्णालयात देखील सॅनिटाझर, मास्क व समांतर अंतर राखण्याचा जणू विसरच पडला आहे. शनिवारी आरटीपीसीआर तपासणीतून ९५ व अँन्टेजन टेस्ट किटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीत २०६ असे ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या सहा हजार ४२५ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर ​

जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा २१९ वर

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी सिडको नांदेड येथील पुरुष (वय ५७), खुदबईनगर नांदेड महिला (वय ५५), जिल्हा रुग्णालयतील व मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील पुरुष (वय ६५), लाभनगर पुरुष (वय ५१) आणि खासगी रुग्णालयातील वजिराबाद येथील रहिवाशी महिला (वय ६०) या पाच बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा २१९ वर पोहचला आहे. 

१७६ रुग्णांची प्रकृती गंभीर

शनिवारी जिल्हा रुग्णालयातील - तीन, पंजाब भवन कोविड सेंटर-७२, बिलोली- एक, हदगाव- नऊ, लोहा- तीन, नायगाव- पाच, हिमायतनगर- दोन, किनवट- एक, धर्माबाद- पाच, मुखेड- २३ व खासगी रुग्णालयातील पाच असे एकूण १२९ बाधित रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रविवारी सायंकाळपर्यंत चार हजार ३६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अहवाल प्राप्त झाला असला तरी, ३८१ स्वॅब अहवालाची उशिरापर्यंत तपासणी सुरुच होती. उपचार सुरु असलेल्यापैकी १७६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचा-  नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य...

रविवारी इथे आढळले रुग्ण

नांदेड शहर- १४२, नांदेड ग्रामीण- १७, भोकर- एक, बिलोली- ३२, लोहा-२९, अर्धापूर- पाच, देगलूर-एक, किनवट-१७, उमरी-तीन, हदगाव- ११, मुखेड-दहा, मुदखेड-नऊ, कंधार-चार, धर्माबाद-पाच, परभणी-एक, बीड-एक, हिंगोली- दोन असे एकूण ३०१ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. 

कोरोना मीटर 

शनिवारी बाधित रुग्ण- ३०१ 
मृत्यू- पाच 
कोरोना मुक्त-१२९ 
कोरोना रुग्णांची एकूण संख्या- सहा हजार ४२५ 
आतापर्यंत कोरोना मुक्त रुग्ण- चार हजार ३६९ 
आतापर्यंत मृत्यू-२१९