

Nanded News
esakal
बिलोली: उन्हाची तीव्रता वाढू लागताच बिलोली शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजना बंद असल्यामुळे मागील आठ महिन्यांपासून अर्ध्यापेक्षा अधिक शहराला नदीचे पाणी उपलब्ध होत नाही. दुसरीकडे शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. नगरपालिका प्रशासनाने पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन झोपडपट्टी भागासह महत्त्वाच्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.