Video - कोरोना लस संशोधनासाठी शरीराचे दायित्व- कोणाचे? ते वाचा

photo
photo

नांदेड: जगभरातील शास्त्रज्ञांनी लस संशोधनामध्ये झोकून दिल्याने सामान्य व्यक्तीच्या नजरा लस विकसीत होण्याकडे लागल्या आहेत. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोरोना लस संशोधन सुरू आहे. लस संशोधनासाठी मानवी किंवा माकडावर या लसचा प्रयोग करण्यात येणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे. कोरोना या जागतिक महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी लस संशोधन प्रक्रियेस उपयुक्त मानवी शरिराच्या दायित्वासाठी नारायण गायकवाड सरसावले आहेत. 

जगभरात थैमान घातलेल्या कोव्हीड १९ विषाणूवर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर लस संशोधन सुरु आहे. कोरोना महामारीवर सध्यातरी प्रभावी लस उपलब्ध नसल्याने खबरदारीच्या उपाय योजनांसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संक्रमण रोखण्यसाठी लॉकडाउनमुळे जनजीवन स्तब्ध आहे. आपत्ती काळात उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने रोजगार क्षेत्र कोलमडले आहे. संसर्गापासून बचावासाठी रोगप्रतिकार आयुर्वेदिक, होमिओपॅथीकच्या औषधींच्या मागणीत भरमसाठ वाढ झाली आहे. 

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय योजनांसह आपत्ती काळात गरीब, गरजुंना आधार देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आपआपल्या स्तरावर पुढे आल्या आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्त लस संशोधन कार्याकडे प्रत्येकाच्या नजरा लागल्या आहेत. जनजिवन सुरळीत होण्यासाठी आज ना उद्या लस संशोधन यशस्वी होईल, अशा भावना सामान्यांतून व्यक्त होत आहेत.

कोरोना महामारीच्या धास्तीने पाहूनचारास मर्यादा तर लागल्याच पण नियमीत सर्दी, खोकला यासह साधारण आजाराविषयी नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. प्रचलित व साधारण आजारावर उपचारार्थ रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नसल्याने अनेक नागरिक डॉक्टरच्या सल्यानुसार ॲन्टीबायोटिक औषधींचा आधार घेत आहे.

यामध्ये बालक, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण आधिक आहेत. वाढत्या मागणीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक व होमिओपॅथीक औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनावर प्रथावी लस उपलब्ध होईपर्यंत खबरदारी हाच उत्तम पर्याय असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे कोरोना लस संशोधन प्रक्रीया सुरू आहे. संशोधानासाठी मानवी अथवा माकडाची गरज असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी कोरोना विरोधी लढ्यामध्ये लस संशोधनकार्यास स्वत:चे शरिर दायित्वासाठी नारायण गायकवाड, खरब खंडगाव (ता. मुखेड) सरसावले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या आवाहनानुसार कोरोना लस संशोधन कार्यास शरिरदान करुन या लढ्यात सहभागी करुन घेण्याची मागणी नारायण गायवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com