esakal | नायगावात धाडसी चोरी : किराणा दुकान फोडून ४ लाख ८० हजाराचा ऐवज केला लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हेडगेवार चौकातील न्यु साई स्मरण किराणा दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सिगारेट व अन्य काही महागाड्या वस्तू असा अंदाजित ४ लाख ८० हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

नायगावात धाडसी चोरी : किराणा दुकान फोडून ४ लाख ८० हजाराचा ऐवज केला लंपास

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : मागील काही दिवसांपासून नायगाव शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून शनिवारी रात्री उशिरा हेडगेवार चौकातील न्यु साई स्मरण किराणा दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सिगारेट व अन्य काही महागाड्या वस्तू असा अंदाजित ४ लाख ८० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. मात्र पोलिसांनी दुकानदारावरच दबाव टाकून चोरीला गेलेला ऐवज कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान चोरीची घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थळ पाहणी केल्यावर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक आले पण चोरट्यांचा काहीही मार्ग सापडला नाही. त्यामुळे आलेले पथक हात हालवत पुन्हा माघारी फिरले. श्वान पथक नरसी रोडकडे गेले व अन्य दोन ठिकाणी गेले त्यामुळे चोरटे नेमके कोणत्या दिशेने आले व कुठे गेले याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे यापुर्वी जवळपास ५० चोरीच्या घटना घडल्या त्याचा आजपर्यंत तपास लागला नाही. तीच अवस्था या चोरीच्या घटनेची होणार आहे. 

हेही वाचा - मराठवाड्यातील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे अस्तित्वच धोक्यात, परवाना नूतनीकरणाची प्रतीक्षा -

तेलाचे डबे असा एकूण ४ लाख ८० हजाराचा ऐवज चोरीला

प्रविण सोमावार यांचे हेडगेवार चौकात न्यु साई स्मरण हे होलसेल व किरकोळ किराणा दुकान असून.  याच दुकानात चोरी झाली. चोरीची घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. घडल्यानंतर दुकान मालकाने नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून. चोरीच्या घटनेत रोख २० हजारासह दुकानातील म्हाडाने सिगारे, तंबाखू, यासह तेलाचे डबे असा एकूण ४ लाख ८० हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. किराणा दुकानातून चोरट्यांनी पाच लाखांच्या जवळपास ऐवज पळविला असतांना नायगाव पोलिस मात्र तपासाचा केवळ देखावाच करत आहेत. दुसरीकडे एवढा ऐवज कसा काय गेला, तुम्ही काय करत होतात, सी सी टिव्ही का बसवले नाहीत, वाँचमन का ठेवला नाही असे उलटसुलट प्रश्न विचारुन परेशान तर करतच आहेत पण एवढी मोठी चोरी झाल्याचे दाखवू नका तुम्हालाच त्रास होतो असा अगाऊ सल्लाही देत आहेत. 

अशी माहिती पोलीस ठाण्यात एस.आर.पडवळ यांनी दिली

दुकानदाराने माझ्या दुकानातून ४ लाख ८० हजाराचा माल चोरीस गेला आहे त्यामुळे मी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भुमिका घेतली आहे. मात्र रविवारी उशीरापर्यंत कसलाही गुन्हा दाखल केला नसून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी आल्यानंतर गुन्हा नोंद करु असे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला का अशी माहिती पोलीस ठाण्यात पोलिस  निरीक्षक एस. आर. पडवळ यांनी दिली. यापुर्वीच्या एकाही चोरीच्या घटनेचा तपास लावण्यात नायगाव पोलिसांना यश आलेले तर नाहीच पण चोरीच्या घटना थांबवताही येत नसल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे