निकृष्ट कामामुळे किनवट तालुक्यातील पुल गेला वाहून; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताफा अडकला

किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामादरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली आहे.
किनवट ताुक्यातील हाच तो पुल वाहून गेला.
किनवट ताुक्यातील हाच तो पुल वाहून गेला.

किनवट ( जिल्हा नांदेड ) : शहर, परिसरात व तालुक्यात ता. १७ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे भेंडीजवळील बेंदीजवळ मार्गावर असलेला पुल वाहुन गेल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. यामुळे तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. याला जबाबदार या मार्गावरील बेजबाबदार कंत्राटदार आहे कारण मागील तीन ते चार वर्षापासुन या राष्ट्रीय माहामार्गाच्या कामामुळे या परिसरातील नागरीकांना अतोनात त्रास व अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे, अनेक प्रवाशांना आपला जीव देखील या दरम्यान गमवाला लागला आहे.

किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामादरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली आहे. यामध्ये किनवटपासुन जवळ असलेला बेंदी तांडा येथील पुल व गोकुळनगर येथील पुल, जलधारा येथिल पुल वाहुन गेल्याने लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहे. ग्रामिण भागातील नागरीक हे आपले गाव, घर गाठण्यासाठी जोखीम पत्करुन रेल्वेच्या रुळावरुन, रेल्वेच्या अंडरब्रिजवरुन मार्ग काढत असल्याने एनवेळी एखादी रेल्वे आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक घटना शनिवारपेठ येथे घडली असुन नागरीक रेल्वे रुळ मोटारसायकलसह ओलांडत असताना अचानक नांदेड ते किनवट येणारी रेल्वे आल्याने नागरीक आपल्या गाड्या सोडुन पळाले.

हेही वाचा - मैदान सोडण्यापूर्वी शफालीने काही खास विक्रम आपल्या नावे केले

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. विपिन हे किनवट दौ-यावर होते. त्यांच्या वाहनांना देखील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा प्रत्यय आला व त्यांचे वाहन देखिल या मार्गावर अडकुन पडले होते. त्यांनी पुढे विदर्भातील उमरखेड तालुक्यातुन मार्ग काढत नांदेड गाठल्याची माहिती प्राप्त होत आहे.

कोठारी ते हिमायतनगर दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराचा दर्जा अत्यंत खराब असुन त्याच्या अक्षमते मुळे या मार्गाला विचित्र स्वरुप प्राप्प्त झाले आहे. कामादरम्यान कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने नागरीकांना व प्रशासनिक अधिका-याला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

याकरिता मार्गसुरळीत व्हावा यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय साहुत्रे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे केंद्रे यांनी संदेश पाठवुन त्यांना सुचना दिली आहे.

येथे क्लिक करा - सहा वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहेत

किनवट तालुका हा अती दुर्गम तालुका असून अशा परिस्थितीत जिल्ह्याशी नेहमी संपर्क तुटतो व जिल्ह्यापासुन १५० कि. मी. अंतर असल्याने भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता किनवट जिल्हा निर्मीती व्हावी ही विविध स्तरावरुन नेहमी मागणी होत आली आहे. परंतु ,याकरीता सक्षम लढा उभारला जात नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com