esakal | सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या जिल्ह्यात काम पूर्ण होण्याआधीच राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोलमोडला; फुलवळ येथील घटना 

बोलून बातमी शोधा

file photo}

गुत्तेदाराचा हलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने निकृष्ट कामाचे उघड पडले पितळ..

सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या जिल्ह्यात काम पूर्ण होण्याआधीच राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोलमोडला; फुलवळ येथील घटना 
sakal_logo
By
धोंडीबा बोरगावे

फुलवळ (जिल्हा नांदेड) : कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकापासून हाकेच्या अंतररावर गेली काही महिन्यांपासून चालू असलेल्या पुलाचे काम पूर्ण होण्याअगोदर काल रात्री अचानक तो पूर्णपणे कोलमोडला असल्याने यात गुत्तेदाराचा हलगर्जीपणा झाला का , संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले याचे मात्र पितळ उघडे पडले आहे. या बाबाीकडे सार्वजनिक बांधकाममंत्री काय निर्णय घेतील हा येणारा काळच ठरविणार आहे.

येथून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य मार्ग जात असून येणाऱ्या काळात याच रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. गेले दीड वर्षांपासून या महामार्गाचे काम चालू असून आणखी किती दिवस चालेल सांगता येणार नाही परंतु आजही अनेक ठिकाणी खाचखळगे सोडुसोडूच काम चालू असल्याने बहुतांश ठिकाणी अर्धवट स्थितीतच काम पहायला मिळते.

सदर पूल हा पूर्णपणे एकाबाजूकडून झुकला असून तो कोलमडून गेला

याच रस्त्यावर ठिकठिकाणी पुलांचे कामही चालू आहेत. अशाच एका पूलाचे काम फुलवळ येथे गेली काही महिन्यापासून चालू आहे. पुलाच्या मूळव्याचे काम पूर्ण होऊन पूल उभारला खरा, पण त्यावरील स्लॅब टाकल्यानंतर त्याला बॉटमला दिलेले सपोर्ट हे स्लॅबचा भार न तोलू शकला. शुक्रवारी (ता. २६) रात्री उशिरा अचानक झुकल्यामुळे सदर पूल हा पूर्णपणे एकाबाजूकडून झुकला असून तो कोलमडून गेला आहे. त्यामुळे सदर बाबीला नेमके जबाबदार कोण ? कामाचा गुत्तेदार का संबंधित अधिकारी ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

पुलाचे काम काम पूर्ण होण्याआधीच तो कोलमडून गेल्याने जनतेतून शंका कुशंका

पुलाचे काम काम पूर्ण होण्याआधीच तो कोलमडून गेल्याने जनतेतून शंका कुशंका व्यक्त केल्या जात असून सुदैवाने या पुलावरुन वाहतूक चालू होण्यापूर्वीच ही घटना घडली ते तरी नशीब नाही तर वाहतूक चालू असताना जर असा प्रकार घडला असता तर नेमकं किती जणांना जीव गमवावा लागला असता ही कल्पनाच न केलेली बरी, अशाही अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.

घडलेल्या या घटनेला नेमके कोण जबाबदार

तेंव्हा सदर कामाचा दर्जा कसा आहे हे चित्र स्पष्ट पहायला मिळाले असल्याने आतातरी संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे जातीने लक्ष देतील का ? असा सवाल ही जनतेतून उपस्थित केला जातो आहे. आणि घडलेल्या या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे , गुत्तेदाराचा हलगर्जीपणा का मिलीभगत करून कामाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी ? याची संबंधितांनी नक्कीच चौकशी करावी अशाही लोकभावना दिवसभर ऐकायला मिळत होत्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे