esakal | शालेय पुस्तके विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला, कशामुळे? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जवळपास पन्नास टक्के पुस्तकांचा साठा तसाच पडून आहे. त्यामुळे शालेय पुस्तके विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे. 

शालेय पुस्तके विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला, कशामुळे? ते वाचाच

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांची पुस्तके शासन उपलब्ध करून देते, यासोबत सर्वच माध्यमांची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याचा परिणाम पुस्तक विक्रीच्या व्यवसायावर झाला असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जवळपास पन्नास टक्के पुस्तकांचा साठा तसाच पडून आहे. त्यामुळे शालेय पुस्तके विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे. 

कोरोनामुळे २४ मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली तरी, विद्यार्थी शाळेत यायला तयार नाहीत. त्यामुळे बहुतांश शाळांनी आॅनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली. परंतु, अनेकजण लाॅकडाउनमुळे बाहेरगावीच असल्याने शालेय पुस्तकांची खरेदी केलेली नही. त्यामुळे शालेय पुस्तक विक्रेते आर्थिक संकटात आले आहेत.

हेही वाचा - जिप शाळांची पत आणि पट वाढविणारा अधिकारी

विद्यार्थी आणि पालकांचे दहावी तसेच बारावीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष असते. शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे राहते. या शैक्षणिक सत्रात शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण पद्धती अनेकांच्या मते पूर्णपणे यशस्वी नाही. परंतु ऐनवेळी शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शाळांमधून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा पुस्तके विक्रेत्यांशी संलग्नित असतात, म्हणजे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेली पुस्तके, शालेय साहित्य त्याच दुकानातून घेण्याचे बंधण आहे. त्यामुळे असे विक्रेते फायद्यात असतात. 

५० टक्के साठा पडूनच
दरम्यान, पहिली ते नववीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांसाठी पुस्तकेच विकत घेतलेली नाहीत. शहरात शालेय पुस्तके व साहित्य विक्रीची पन्नास दुकाने आहेत. हा व्यवसाय जून ते ऑगस्ट जोमात चालतो. त्यानंतर वर्षभर पर्यायी शैक्षणिक साहित्याचीच मागणी असते. या वर्षात बोलविलेला पुस्तकांचा जवळपास पन्नास टक्के साठा तसाच दुकानांमध्ये पडून आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले. 

हे देखील वाचाच - Video- नांदेडचे व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात, काय आहे कारण?
 
पुस्तक घेण्यासाठी शाळांकडून तगादा 
शाळा केव्हा सुरू होईल, याबाबत निश्‍चिती नाही. पण दुकानांचे नाव सांगून पुस्तके घ्यावीच लागतील, असा तगादा काही खासगी शाळांकडून लावल्या जातो. शैक्षणिक नुकसानीची भीतीही दाखविल्या जाते. पालकसुद्धा पाल्यांना भविष्यात त्रास होईल म्हणून बोलायला तयार नाहीत. 
  

दिवाळीच्या सत्रानंतरतरी अर्ध शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली पाहिजे. असे झाले नाहीतर दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या पुस्तकांना वर्षभर सुरक्षित ठेवण्याचे आव्हान विक्रेत्यांपुढे असणार आहे. परिणामी विक्रेत्यांना आर्थिक झळ सोसावी लागेल, याचा शासनाने विचार करावा, एवढीच अपेक्षा आहे. 
- हनुमंतराव मनियार, शालेय पुस्तक विक्रेते, 

loading image
go to top