esakal | कर्टुल्याची भाजीशेती ठरते वरदान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पारंपारिक शेतीला बगल देत बोरवाडी (ता. भोकर) येथील एका शेतकऱ्याने जवळपास तीन एकर शेतीवर “करटुला" ही भाजी शेती फुलविली आहे.

कर्टुल्याची भाजीशेती ठरते वरदान

sakal_logo
By
रामराव मोहिते

घोगरी, (ता. हदगाव) : प्रतिवर्षी निसर्गाची अवकृपा होण्याने, शेतीतील उत्पादनावर मर्यादा येत असल्याचे पाहून पारंपारिक शेतीला बगल देत बोरवाडी (ता. भोकर) येथील एका शेतकऱ्याने जवळपास तीन एकर शेतीवर “करटुला" ही भाजी शेती फुलविली आहे. या गोड “कारल्या”भाजीला बाजारात     मोठी मागणी असल्याने ही भाजी शेती फलदायी ठरत आहे.

घोगरी सज्जाचे तलाठी संजय आनंदराव वानोळे यांची शेती ही बोरवाडी (ता. भोकर) येथे असून वडील आजवर शेती ही पारंपारिक पद्धतीनेच करत असत. प्रतिवर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीतील उत्पन्न म्हणावे तसे मिळत नसल्याचे पाहून, सदर शेतकऱ्यांनी अल्पावधीतच येणारे, व सीताफळ पीकाला बाधा न ठरणारे असे आंतरपीक म्हणून “कर्टूला" या नैसर्गिक वन भाजीची निवड केली आहे. ही वन भाजी डोंगरात व शेतीच्या बांधावर मोठ्या प्रमाणात आढळत असूनही, ही भाजी आजवर दुर्लक्षितच होती . याशिवाय “कर्टूला" या भाजी शेतीची लावगड अत्यंत सोपी असून कंदमुळे तसेच बिया पासूनही त्यांची लागवड करता येते . 

दुसर्‍या वर्षीच या वेलीला फुलाचा, फळाचा बहर लगडलेला दिसून येतो

या भाजी पिकाची लागवडीसाठी जमीन साधारणता डोंगर उताराची, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी लागते. लागवडीनंतर"कर्टुले" वेल ही अति जोमाने वाढू लागतो. केवळ दुसर्‍या वर्षीच या वेलीला फुलाचा, फळाचा बहर लगडलेला दिसून येतो. हे पीक केवळ अडीच महिन्याची असल्याने, शिवाय बाजारपेठ जवळच मिळत असल्याने या भाजीसाठी खर्चिक बाब अल्प असून, संपूर्ण नैसर्गिक असल्याने, खते, औषधी फवारणीची अजिबात गरज नाही. यामुळे या भाजी शेतीला बाजारात मोठी पसंती असून, या "कर्टुला" नैसर्गिक भाजीचे सेवन हे मधुमेह, रक्तदाब,  शिवाय कर्टुली भाजीमुळे     रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित राखले जात असल्याने, या भाजीला अनन्य महत्व प्राप्त आहे.

हेही वाचानांदेडातील धक्कादायक प्रकार : सोन्यासाठी महिलेचे तोडले कान

दुर्लक्षित असलेली पण बाजारात मोठी मागणी

एवढी गुणकारी व रुचकर भाजी असूनही, आजवर या भाजीला महत्वाचे स्थान दिले नसल्याचे दिसुन येते. परंतु घोगरी सज्जाचे तलाठी संजय आनंदराव वानोळे यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी ही दुर्लक्षित असलेली पण बाजारात मोठी मागणी असलेली “कर्टूला" या भाजी शेतीची जवळपास तीन     एकर शेतीमध्ये सिताफळ पिकात आंतरपीक म्हणून लावगड करून उत्पन्न मिळवीत आहेत. यातून त्यांना बर्‍यापैकी मिळकत मिळत असून याचेच अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करावे, व उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे असे त्यांचे म्हणणे आहे.

“कर्टुला" या नेसर्गिक भाजी

सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून “कर्टुला" या नेसर्गिक भाजीची निवड करण्यात आली आहे. गतवर्षी लावगड केली व या वर्षी उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षी एकरी पाच ते सात क्विंटल कर्टुले (माल) निघण्याचा अंदाज असून बाजारात किमान शंभर रुपये किलो भाव अपेक्षित आहे. यासाठी केवळ पाच हजार खर्च आला आहे. पारंपरिक शेती पेक्षाही ही भाजी शेती फायदेशीर ठरणारी आहे.
- संजय आनंदराव वानोळे तलाठी, सज्जा घोगरी
 

संपादन - प्रल्हाद  कांबळे

loading image