Nanded News : विवाहितेच्या खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; नातेवाइकांनी मृतदेह २० तासांनंतर घेतला ताब्यात

विश्रांतीने सोमवारी (ता. सहा) सायंकाळी आईला फोन करून आज माझ्या जिवाचे बरेवाईट होण्याची भीती बोलून दाखविली होती.
case against the murder of married woman relatives took body into custody after 20 hours
case against the murder of married woman relatives took body into custody after 20 hoursSakal

तामसा : खरबी (ता. हदगाव) येथील विवाहिता विश्रांती बालाजी डाखोरे (वय २७) हिच्या मृत्युप्रकरणी आईच्या तक्रारीवरून नवरा, सासू व नवऱ्याचा मामा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा मनाठा (ता. हदगाव) पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. सात) रात्री उशिरा नोंदविण्यात आला.

मयत विवाहितेची आई लक्ष्मीबाई नामदेव भिसे (रा. केदारगुडा, ता. हदगाव) यांनी तक्रारीत नवरा बालाजी डाखोरे, सासू शीलाबाई डाखोरे, नवऱ्याचा मामा शिवाजी खानदोडे यांनी विश्रांतीच्या चारित्र्यावर संशय घेत घरकुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ करून तिचा खून केल्याचा आरोप केला आहे.

विश्रांतीने सोमवारी (ता. सहा) सायंकाळी आईला फोन करून आज माझ्या जिवाचे बरेवाईट होण्याची भीती बोलून दाखविली होती. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास तिच्या माहेरी तिने आत्महत्या केल्याची बातमी गेली. तिची आई व इतर नातेवाईक खरबीला गेले. घटनास्थळ पाहिल्यावर विश्रांतीच्या आत्महत्येबद्दल संशय येऊन हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूनंतरही विश्रांतीच्या पार्थिवाची अवहेलना चालू झाली.

मंगळवारी पहाटे तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पार्थिव नेले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. पण, माहेरच्या मंडळींनी खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तब्बल वीस तासांनी ताब्यात घेतलेल्या विश्रांतीच्या पार्थिवावर मध्यरात्रीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com