esakal | नायगाव तालुक्यातील १९ गावच्या आरक्षणात बदल; प्रस्थापितांना धक्का तर नवख्यांना संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या बदलामुळे घुंगराळा, कुंटूर, सातेगाव,धनंज, निळेगव्हाण, अंतरगाव व मोकासदरा येथील प्रस्थापितांना धक्का बसला आहे. तर अंचोली, हुस्सा, मुगाव येथील सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळाली आहे. 

नायगाव तालुक्यातील १९ गावच्या आरक्षणात बदल; प्रस्थापितांना धक्का तर नवख्यांना संधी 

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : अनुसूचित जाती व जमातीचे पुर्वीचेच आरक्षण कायम ठेवत सरपंच पदाच्या दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्गाच्या १२ तर इतर मागासवर्गीयासाठीच्या सात गावच्या आरक्षणात बदल झाला आहे. या बदलामुळे घुंगराळा, कुंटूर, सातेगाव, धनंज, निळेगव्हाण, अंतरगाव व मोकासदरा येथील प्रस्थापितांना धक्का बसला आहे. तर अंचोली, हुस्सा, मुगाव येथील सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळाली आहे. 
      
मागच्या वर्षी मुदत संपलेल्या व या वर्षांत मुदत संपत असलेल्या नायगाव तालुक्यातील ८० गावच्या सरपंच आरक्षणाची सोडत ता. १९ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयात पार पडली होती. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने पुर्वीचे काढलेले आरक्षण रद्द केले व निवडणुका झाल्यानंतर नव्याने सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार काल (ता. तीन ) फेब्रुवारी रोजी येथील तहसील कार्यालयात नव्याने ८० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली. यात अनुसूचित जाती व जमातीचे पुर्वीचेच आरक्षण कायम ठेवण्यात आले तर नवीन आरक्षणात तालुक्यातील १९ गावचे कारभारी बदलणार आहेत.तालुक्यातील माहत्वाची वसंत सुगावे यांची घुंगराळा ग्रामपंचायत पुर्वी ओबीसी पुरुषासाठी आरक्षित होती तर आता ओबीसी महीलेसाठी आरक्षित झाली आहे पण त्यांच्याकडे महीला उमेदवारच नाही. कुंटूरमध्ये रुपेश कुंटरकरांचे दुसऱ्यांदा सरपंच होण्याचे स्वप्न भंगले असून कुंटूरसह गडगा, मोकासदरा, कोठाळा व मनुर त.ब. अगोदर सर्वसाधारण पुरुषाला होते आता महीलेसाठी आरक्षित झाले आहे. सातेगाव सर्वसाधारण पुरुष आता ओबीसी महीला, धनंज सर्वसाधारण महीला आता ओबीसी महीला, खंडगाव ओबीसी पुरुष होते आता सर्वसाधारण महीला, मुगाव अगोदर ओबीसी महीला होते आता सर्वसाधारण पुरुष, चारवाडी ओबीसी महीला आता सर्वसाधारण पुरुष, परडवाडी सर्वसाधारण महीला आता ओबीसी महीला, निळेगव्हाण आणि वजीरगाव ओबीसी महीला आता ओबीसी पुरुष, अंतरगाव सर्वसाधारण महिला आता सर्वसाधारण पुरुष, तलबीड सर्वसाधारण महीला आता ओबीसी महीला, हुस्सा आणि अंचोली येथे पुर्वी  सर्वसाधारण महीलेसाठी आरक्षित होते तर आता सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे तालुक्यातील काही प्रस्थापितांना धक्का बसला असून काही उपसरपंच होवून कारभार करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांना लाँटरी लागली आहे. त्यामुळे कही खुशी तर कही गमचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे