'पॅराशूट'च्या बनावट उत्पादनाची विक्री,व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

नायगाव (जि.नांदेड) : जप्त केलेले पॅराशूटचे बनावट उत्पादन.
नायगाव (जि.नांदेड) : जप्त केलेले पॅराशूटचे बनावट उत्पादन.

नायगाव (जि.नांदेड) : पॅराशूट कंपनीचे बनावट उत्पादने विक्री ( Fake Selling Of Parachute Company's Products) केल्याप्रकरणी नायगाव येथील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या विरोधात सोमवारी (ता.दोन) गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांनी अन्य काही व्यापाऱ्यांच्या मदतीने बनावट उत्पादन विकण्याचे (Crime In Nanded) तालुकाभर जाळे निर्माण केले असल्याची जोरदार चर्चा होत आहे. कारवाईची चर्चा शहरभर पसरल्याने काही वेळातच बनावट उत्पादने दुकानातून गायब करण्यात आले हे विशेष. नायगाव (Naigao) शहरातील एक व्यापारी अनेक नामांकित कंपनीचे बनावट उत्पादने दुसऱ्या राज्यातून (Maharashtra) मागवून काही लोकांच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षांपासून विक्री करत असल्याची चर्चा होती. पण याबाबत एकाही कंपनीने पुढे येऊन कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी पॅराशूट तेलाच्या नावाखाली नायगाव शहरात बनावट उत्पादन विकत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यामुळे कंपनीने पाळत ठेवून शहरातील काही दुकानातून हे उत्पादन विकत घेतले व त्याची खात्री केली.

नायगाव (जि.नांदेड) : जप्त केलेले पॅराशूटचे बनावट उत्पादन.
जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

यात नाव साधर्म्य असलेल्या कंपनीकडून तीन व्यापारी बनावट उत्पादन विकत असल्याचे आढळून आले. मैत्रिका कन्सल्टींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सिद्धेश सुभाष शिर्के यांनी सोमवारी (ता.दोन) नायगाव पोलिसांना सोबत घेऊन व्यंकटेश प्रोव्हिजन स्टोअर्ससह अन्य काही दुकांनाची झाडाझडती घेतली. यात व्यंकटेश प्रोव्हिजनचे अनिल विठ्ठल गादेवार यांच्यासह प्रकाश अनंतराव कवटीकवार आणि अनिल बाबूराव कोटलवार हे मैत्रिकाचे पॅराशूट तेलाचे बनावट उत्पादन दुकानात ठेवून विक्री करतांना आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा सदर प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात वरील तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नायगाव (जि.नांदेड) : जप्त केलेले पॅराशूटचे बनावट उत्पादन.
'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज

तालुक्यात उलटसुलट चर्चा

जे व्यापारी बनावट उत्पादन विकत होते ते बडे व्यापारी असल्याने नायगाव पोलिस सहकार्य करणार नाहीत. यामुळे सदर प्रकरणी कंपनीने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकाकडूनच आदेश प्राप्त करुन घेतले होते. नायगाव पोलिसांनी त्या आदेशानुसार मदत केली असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरात कारवाई करायचे आहे एवढेच सांगितले. कुठे करायची याची मात्र माहिती दिली नाही. केवळ आमच्या सोबत या अशा सूचना दिल्या होत्या. पोलिस वाहनासह कंपनीचे अधिकारी कारवाई करण्यास सुरुवात केल्याने शहरात प्रचंड अफवा पसरली होती. गुन्हा नोंद झालेले व्यापारी शहरातील नामांकित असल्याने नायगाव पोलिसांनीही तेवढीच अर्थपूर्ण तत्परता दाखवून रात्रीलाच नोटीस देऊन सोडून दिल्याने याबाबत आज दिवसभर उलटसुलट चर्चा होत होती.

नायगाव (जि.नांदेड) : जप्त केलेले पॅराशूटचे बनावट उत्पादन.
वैद्यकीय अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

तेलंगणातून आणला जातो माल

बनावट उत्पादन प्रकरणी शहरात कारवाई सुरु होताच. त्या व्यापाऱ्यांनी घरी असलेला माल तत्काळ हलवला असून त्याच्या घराच्या झाडाझडतीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना काहीही हाती लागले नाही. नामांकित कंपनीचे बनावट तेल, चहा पत्ती, बिस्किटे तेलंगणातून आणत असल्याचे बोलल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com