Video- मराठा समाजाने वकील लावावा, पैसे आम्ही देऊ : कोण म्हणाले? वाचाच

प्रमोद चौधरी
Thursday, 17 September 2020

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून मराठा समाजाच्या भावना संतप्त झालेल्या आहेत. परिणामी, छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी नांदेडमध्ये पालकमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले.

नांदेड : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण राज्य शासनाला न्यायालयामध्ये टिकवता आले नाही. परिणामी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आतापर्यंत महात्मा गांधीं यांच्या विचारसरणीला अनुसरून आंदोलने झाली आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटला नाहीतर दोन आॅक्टोबरपासून मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला.

छावा संघटनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात मराठवाडा विभागीय बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्याची सुरुवात पालकमंत्री व आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी (ता.१७) त्यांच्या निवासस्थानासमोर छावा संघटनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन केले. दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून शिवाजीनगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.  

हेही वाचा - नांदेड : कोरोनामुळे मृत्यू स्वस्त पण अंत्यविधी अवघड

बराचवेळ आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी देवून शिवाजीनगर दणाणून टाकला होता. दरम्यान पालकमंत्री अशोक चव्हाण आपल्या निवासस्थानी येवून तीन ते चार शिष्टमंडळांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यामध्ये नानासाहेब जावळे यांच्यासह छावाचे विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांचा समावेश होता. 

हे देखील वाचाच - नांदेड : मालेगावमध्ये एसबीआय बँकेचा सायरन वाजला आणि पुढे हे घडले

तुम्ही वकील लावा, आम्ही पैसे देवूत
छावा संघटनेच्या शिष्टमंडळासोबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय आता न्यायालयात असल्याने मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. केंद्र शासनाकडे हा विषय गेलेला आहे. तुम्ही मराठा समाजाच्या वतीने वकील लावा, आम्ही त्याचे शुल्क भरूत. आरक्षणाच्या विषयावर मी आता काहीच बोलू शकत नाही’’.  

 

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत आमच्यामध्ये गांधीजी होते. मात्र, दोन आॅक्टोबरनंतर गांधी विचाराने नाही शिवछत्रपतींचे मावळे म्हणून रस्त्यावर उतरू.
- नानासाहेब जावळे, संस्थापक अध्यक्ष छावा संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhava Agitation In Front Of Guardian Minister House Nanded News