esakal | धक्का लागल्याच्या कारणावरुन खून करणाऱ्यास जन्मठेप- प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचा निकाल

बोलून बातमी शोधा

file photo}

शहरातील तारासिंग मार्केट येथे खरेदीस आलेल्या पाडूरंग गणपती सुर्यवशी रा. तळणी (ता. जि. नांदेड) हे खरेदीनंतर घराकडे परताना हॉटेल मन्मथ साई दुकानासमोरुन जात असताना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोहमद खाजा मोहमद इसार रा. देगलूर नाका यास त्यांचा धक्का लागला.

धक्का लागल्याच्या कारणावरुन खून करणाऱ्यास जन्मठेप- प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचा निकाल
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : धक्का का लावला म्हणून डोक्यात लाकडी दांड्याने मारुन एकाचा खून करण्यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी बुधवारी (ता. तीन) मार्च रोजी दुपारी सुनावली. गुन्हा घडला तेंव्हापासून आरोपी हा कारागृहातच बंदीस्त होता.  

शहरातील तारासिंग मार्केट येथे खरेदीस आलेल्या पाडूरंग गणपती सुर्यवशी रा. तळणी (ता. जि. नांदेड) हे खरेदीनंतर घराकडे परताना हॉटेल मन्मथ साई दुकानासमोरुन जात असताना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोहमद खाजा मोहमद इसार रा. देगलूर नाका यास त्यांचा धक्का लागला. या कारणावरुन आरोपी मो. खाजा मो. इसार याने हातातील लाकडी दांड्याने डोक्यात घाव घालून खून केला होता. त्यानंतर जमावाने मोहमद खाजा यास ताब्यात घेऊन वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुर्यवंशी याला विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. 

याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 394/2017 कलम भादंवि 302 अन्वये सहायक पोलिस निरीक्षक सुनिल बडे यांनी दाखल केला. व पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डाॅ.मनोज पांडे यांनी केला. तपासाअंती न्यायालयात दोषारोप ठेवून खटला क्र 33/2018 दाखल केला. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

जिल्हा सरकारी वकील आशिष दत्तात्रय गोधमगावकर व बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकूण समोर आलेल्या पुराव्यावरुन गुन्हा सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी दिनेश सगरोळीकर, तज्ञ डॉक्टर गुशिंगे, तपासिक अधिकारी पोउनि मनोज पांडे व ईतर साक्षीदारांची साक्ष तपासून आरोपी मो. खाजा मो. इसार रा. देगलूर नाका, नांदेड यास जन्मठेप ठोठावली. तसेच  पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न दिल्यास सहा महिने अधिकची शिक्षा सुनावली. सदरच्या प्रकरणात बालाजी लामतुरे यानी पैरवी अधिकारी म्हणन काम पाहिले.