प्रेरणादायी ः स्वखर्चातून तयार केला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर देशमुख यांची जनसेवा नेहमीच चर्चेत असते. ना कोठले राजकीय पद, ना पदाची अपेक्षा पण जनसेवेसाठी सदैव अग्रेसर असणार हे आगळं वेगळं युवा नेत्रृत्व यांनीच सामाजिक बांधिलकी जोपासत गावाच्या व परिसरातील गावाच्या सार्वजनिक विकास घडवायचे झाले तर हे आताचे ताजे उदाहरण म्हणून धानोरा ते बोळसा रेल्वे स्टेशन हा तब्बल दीड कीमी चा रस्ता स्वखर्चातून निर्माण केला आहे.

उमरी, (जि. नांदेड) ः तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर देशमुख यांची जनसेवा नेहमीच चर्चेत असते. ना कोठले राजकीय पद, ना पदाची अपेक्षा पण जनसेवेसाठी सदैव अग्रेसर असणार हे आगळं वेगळं युवा नेत्रृत्व यांनीच सामाजिक बांधिलकी जोपासत गावाच्या व परिसरातील गावाच्या सार्वजनिक विकास घडवायचे झाले तर हे आताचे ताजे उदाहरण म्हणून धानोरा ते बोळसा रेल्वे स्टेशन हा तब्बल दीड कीमी चा रस्ता स्वखर्चातून निर्माण केला आहे.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे
याठिकाणी अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी रस्ता झाला होता, पण नंतरच्या काळात येथील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. बोळसा रेल्वे स्टेशनहून ये-जा करणाऱ्याची संख्या खूप असून या भागातील भाजीपाला व्यापारी, फुल शेती व ईतर व्यापार करण्यासाठी जाणारे, तसेच सर्वच शालेय विद्यार्थी याच बोळसा रेल्वे स्टेशनहून उमरी, नांदेड, औरंगाबाद, व धर्माबाद, निझामबाद, हैदराबाद येथे ये-जा करीत असतात. पण गेली कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर अनेक काटेरी झाडे झुडपे वाढल्याने मोठ्या कसरतीने येथून वाट काढावी लागत होती. या भागातील बाचेगाव, पांगरी, राजापूर, बोळसा, वाघाळा, मडाळा, यासह अनेक गावातील नागरिक व विद्यार्थी याच रेल्वे स्टेशनहून ये-जा करीत असतात. त्यासाठी हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी हवा होता तो निस्वार्थ जनसेवेचा हाथ आणी हे काम सुधाकर देशमुख यांनी स्वखर्चातून पूर्ण केल्याने उमरी तालुक्यात त्यांच्या जनहीतासाठीच्या तळमळीचे मोठे कौतुक होत आहे.

 हेही वाचा -  कोरोना ब्रेकिंग : नांदेडला चारशेचा आकडा पार, शुक्रवारी १६ रुग्ण सापडले

शेकडो कुटुंबाची जबाबदारी 
यापूर्वी कोरोना या महाभयंकर महामारीच्या पार्श्‍वभूमीवर देशमुख यांनी येथील शेकडो कुटुंबाची जबाबदारी स्विकारून त्यांना एक एक महिन्याचे अन्नधान्य दिले होते व बाहेरगावी अडकलेल्या अनेक मजुरांना त्यांच्या खात्यात ऑनलाइन पैसे पाठवले होते. या भागातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी देशमुख यांनी अनेक वेळा वेळप्रसंगी मोठ-मोठी आंदोलने उभारली. ऐव्हढेच नाही तर गोरगरिबांच्या सुख व दु:खात सहभाग घेऊन गोरगरिबांच्या मुलींचे विवाह लाऊन संसार उपयोगी साहित्य दिले. या सर्व त्यांच्या समाज सेवेतून ते आज नांदेड जिल्ह्यात एक आदर्श समाज सेवक नावाने चर्चेत आहेत. या भागातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी आप आपसातील राजकीय हेवे-दावे विसरून अशा प्रकारची जनसेवा करून देशमुख यांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा या भागातील जनता व्यक्त करत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Citizen Has Built A Road At His Own Expense, Nanded News