esakal | नांदेड : पोस्टल सप्ताहाद्वारे योजनांची नागरिकांना होणार ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

post

पोस्टल सप्ताहाद्वारे योजनांची नागरिकांना होणार ओळख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पोस्टाच्या विविध योजनांची नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने जागतिक टपाल दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड डाक विभागाकडून पोस्टल सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेडचे डाक अधीक्षक पी. एस. माधवराव यांनी दिली.

पोस्टल सप्ताहाअंतर्गत शनिवार (ता. नऊ) ते १६ आॅक्टोबर दरम्यान विविध उपक्रम टपाल विभागाकडून राबविले जाणार आहे. यासंदर्भात पोस्टामध्ये नुकतीच बैठक झाली असून, त्यामध्ये श्री. माधवराव बोलत होते. सहाय्यक डाक अधीक्षक (मुख्यालय) एम. एन. पटेल यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये पोस्टल सप्ताह निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आहे.

हेही वाचा: ‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

सोमवारी (ता.११) बँकिंग दिनानिमित्त (आयपीपीबी) इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे पोस्ट बँकेतील गुंतवणुकी बाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन ग्राहक पोस्ट बँकेशी जोडला जावा यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मंगळवारी (ता.१२) इन्शुरन्स दिनी भारतीय डाक जीवन विमा (पीएलआय) ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय)याबाबत जनजागृती करण्याबरोबरच जीवनात विमा असणे किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विशद करण्यात येणार आहे. तसेच मुख्य डाकघर आवारात विशेष काउंटरद्वारे विमा वितरित केला जाणार आहे.

बुधवारी (ता.१३) फीलाटेली दिनानिमित्त पोस्टाची तिकिटे, पोस्टाचे पाकीट, विशेष तिकिटे, कव्हर्स जमवण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून ज्यांना हा छंद नव्याने जोपासायचा आहे अशा व्यक्तींसाठी (पीडीए) फिलाटेली डिपॉझिट अकाउंट उघडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तसेच माय स्टॅम्प या योजनेची सखोल माहिती देण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.१४) व्यवसाय विकास दिनानिमित्त स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट करण्यासाठी मुख्य डाकघर येथे आलेल्या ग्राहकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शनिवार (ता.१६) मेल्स डे साजरा करण्यात येत असून, या दिवशी टपाल बटवड्याचे मुख्य आणि महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोस्टमनला सन्मानित करण्यात येणार आहे. या पोस्टल सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन पोस्टाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे आव्हान नांदेड मुख्य डाकघरचे पोस्टमास्टर डी.एम.जाधव यांनी केले आहे. यावेळी डी. आर. शिवणिकर, एस.आर.मामीडवार, श्री. गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top