नांदेड : अकरावीच्या केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवार (ता. २१) पासून सुरवात होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या वेबसाइटला तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.