esakal | हवामानातील बदलामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत; भाजीपाल्यासह फळ पिकेही धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

फळबाग

हवामानातील बदलामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत; भाजीपाल्यासह फळ पिकेही धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाच्या सोयाबीन, मूग, ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही दिवसात घरात येणारे उत्पन्नाचा फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिके घेऊन झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई काढण्याच्या मनसुब्याने शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, मका, कांदासह भाजीपाल्याचे पीक घेण्याच्या तयारीत लागला आहे. परंतु, हवामानातील बदलामुळे सुरुवातीला हरभरा पिकावर मर रोग आल्याने त्याच्याही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असल्याने, त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात फरक दिसत आहे.

गेल्या आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या खरीप हंगामातही कपाशी पिकावर आलेली बोंड अळी, लाल्या रोग, मूळ, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनातही मोठी घट दिसून येत आहे. कापूस वेचणीचा आणि शेतातून घरापर्यंत वाहतूक खर्च आणि मजूरी वाढली, बाजारपेठत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच नाराज होत आहे. एकरी खर्चाचे प्रमाण विचारात घेतले, तर त्याचे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

हेही वाचा - जिंतूर शिवारात दुसऱ्यांदा आढळला 'स्वर्गीय नर्तक' पक्षी

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ः

खर्चाची ताळमेळ बसवताना हाती येणारे निव्वळ उत्पन्न शून्य अशी अवस्था आहे. त्यामुळे कुठ पीक, तर कुठ कोरडी जमीन दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कीड आणि अळीचे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालल्याने हेही पीक हातचे जाते का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भाजीपाल्यासोबतच फळ पीकांनाही बदलत्या वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

अवकाळी पाऊस आणि अचानक वाढलेले तपमान, ढगाळ वातावरणाणे एकूणच रब्बीतील पिके आणि भाजीपाला धोक्यात आला असून, याचा मोठ्या प्रमाणात पिकांवर आणि त्याच्या वाढीवर वाईट परिणाम झाल्याने या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

- रावसाहेब घुगे पाटील (शेतकरी)

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image