कोरोनाला हरवण्यासाठी बंद हा उपाय योग्य नाही ः डॉ. जेठवाणी

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : लोकांना दुकानं बंद करा सांगत फिरणारे अनेकजण आहेत. मात्र घरोघरी जाऊन जनजागृती करत नाही. लोकांमध्ये जागृती नसल्याने लोक गर्दी करणे, हस्तांदोलन करणे, मास्क न वापरणे वैगरे प्रकार करणे साहजिकच असल्याचे नृत्य दिग्दर्शक डॉ. भरत जेठवाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

आगामी काळात अजूनही रुग्ण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक वेळी दुकानं आणि मार्केट बंद करणार आहोत का? गेले तीन महिन्यापासून लोकांच्या हाताला काम मिळत नसल्याने लोक बेजार आहेत. आता त्यांना पोटापाण्यासाठी बाहेर पडावेच लागणार आहे. म्हणून कोरोनाला हरविण्यासाठी बंद हा उपाय नाही, असे डॉ. जेठवाणी सांगतात.  जेव्हा शासनाने बंद पाळायला सांगितला होता तेव्हा अनेकजण मोकाट फिरत होते. आता बंद वैगरे यशस्वी होत नाहीत, आणि सोयीचे सुद्धा नाही असे कळल्यावर शासनाने रुग्ण वाढत असूनही अनलॉक करायला सुरुवात केली.

बाहेरुन यणाऱ्यांमुळे भिती

दुकाने, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली.  पण आम्ही सगळ्याच बाबतीत उशिरा जागे होतो. जेव्हा बंद पाळायचा तेव्हा पाळला नाही आणि लोकांना बाहेर पडून काम करणे, कमावणे गरजेचे असताना आम्ही मात्र  बंद वैगरे पाळतो. रोज कित्येक लोक बिना मास्क फिरतात, आम्ही मात्र त्याकडे कानाडोळा करतो. कित्येक नेते, अधिकारी, कार्यकर्ते इतर शहरातून आपल्या गावामध्ये येऊन गेले. काही नेते अजूनही येत आहेत, त्यांच्यापासून सुध्दा कोरोना संसर्ग होण्याची संभावना असते.

अनेकांनी मास्क गळ्यात अडकवलेला असतानाही आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. मास्क बाजूला सारून सेल्फी घेतो, त्यांच्याशी बोलताना, चर्चा करताना त्यांना मास्क लावा म्हणून विचारणा करण्यासाठी आपल्याकडे हिम्मत नसते. पण हातावर पोट असणाऱ्या भाजीवाल्या मावशीला मात्र हटकतो. दुकानं बंद म्हणजे दुकानातले गडी, हमाल वैगरे यांचं देखील काम बंद. कुठून पोसणार आहेत त्यांचे कुटुंब? 

समाजसेवी, संघटनानी जनजागृती करावी

आता घरात बसण्याची परिस्थिती नाही. अशाने उपासमार होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्येकजण पोटापाण्यासाठी झटतोय. बंद वैगरे करण्यावर भर न देता आपण सर्वांनी जनजागृती करण्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. लोकांना मास्क वापरण्याचे महत्त्व सांगणे, सॅनिटायझर  वापरणे किंवा वारंवार साबणाने हात कसे स्वच्छ धुता येतील या बद्दल माहिती देणे, सोशल डिस्टन्सचे महत्त्व पटवून देणे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याची विनंती करणे यासारखी कामे केली तर ती आपल्याला आणि आपल्या शहराला भविष्यात कोरोनाशी लढण्यासाठी नक्कीच महत्वाची ठरतील, असेही डॉ. जेठवाणी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com