Vande Bharat Express: आजपासून ‘वंदे भारत’ नांदेड मुंबई मार्गावर धावणार; सीएम फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा
CM Devendra Fadnavis: नांदेड-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा सोहळा २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर होईल.
नांदेड : हुजूर साहिब नांदेड-मुंबई सीएसएमटी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (ता.२६) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नांदेड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील.