Temperature Drop : जिल्ह्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला; तापमानात घट होण्याची शक्यता; कृषी विद्यापीठाचा अंदाज
Cold wave : नांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे आणि तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात दोन दिवस धुके आणि थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
नांदेड : जिल्ह्यात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढला असून सकाळी बोचऱ्या थंडीने नागरिकांना गारठून टाकले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात धुक्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.