esakal | जिल्हाधिकारी डॉ. विपीन पोहंचले थेट... आणि उडाली एकच धांदल 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रशासन या कामात व्यस्त असल्याची संधी साधून वाळू माफियांकडून अवैधरित्या हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करुन साठा करत आहेत. अशाच एका वाळू साठ्यावर थेट जिल्हाधिकारी यांनीच धाड टाकली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन पोहंचले थेट... आणि उडाली एकच धांदल 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. या गंभीर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी व सर्वच त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. मात्र कोरोना काही थांबायला तयार नसल्याचे दिसुन येते. प्रशासन या कामात व्यस्त असल्याची संधी साधून वाळू माफियांकडून अवैधरित्या हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करुन साठा करत आहेत. अशाच एका वाळू साठ्यावर थेट जिल्हाधिकारी यांनीच धाड टाकली. जिल्हाधिकारी वाळू घाटावर आल्याचे समजताच मुदखेड तहसिलदार व महुसल पथकाचे व वाळू साठे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड तालुक्यात वाळू घाटावर स्टिंग ऑपरेशन करुन खुद्द जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी साडेतीनशे ब्रास वाळू साठा जप्त केला. मुदखेड तालुक्यातील टाकळी येथे ही अवैध वाळू उत्खनन करून ठेवलेल्या साठ्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन यांनी ता. २४ जुलै च्या रात्री गोदावरी नदीपात्रात जाऊन स्टिंगऑपरेशन करून साडेतीनशे ब्रास वाळू साठा जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा -  घोरपड विकणारी टोळी नांदेड वन विभागाच्या जाळ्यात

वाळूचे साठे बेवारस असल्याचे दिसून आले

तालुक्यातील टाकळी येथे अवैध वाहतूक उत्खनन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी व त्यांचे अंगरक्षक या दोघांनीच रात्री भर पावसात टाकळी येथील गोदावरी पात्रात जाऊन वाळू साठ्याची पाहणी केली. दरम्यान त्यांना टाकळी येथे अवैध वाळू उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी सदरची वाळू जप्त करण्याचे आदेश दिले. गेल्यावर्षीही टाकळी येथे अवैध वाळू उत्खनन करुन मोठ्या प्रमाणावर साठा करुन ठेवले होते. वाळूचे साठे बेवारस असल्याचे दिसून आले. हा अवैध वाळूसाठा घेण्यासाठी कोणीही लिलावात भाग घेतला नाही. आता दुसऱ्यांदा येथेच अवैध वाळू उत्खनन करुन साठा केल्याचे दिसून आले आहे.

अधिकाऱ्यांची पाचावर धारण

ता. २५ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी पवनकुमार चांडक व तहसीलदार दिनेश झाम्पले, नायब तहसीलदार संजय सोलंकर, मंडळाधिकारी पठाण, तलाठी श्री खेडकर, पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले, फौजदार श्री बुक्‍तरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी टाकळी येथे जाऊन पंचनामा केला. जिल्हाधिकारी थेट अचानक वाळू घाटावर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले. 

loading image
go to top