नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांना कोरोनाची बाधा 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 1 September 2020

त्यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्या संपर्कातील महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने हे मात्र निगेटीव्ह आले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता खुद्द जिल्हाधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्या संपर्कातील महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने हे मात्र निगेटीव्ह आले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त या चाचणीत निगेटिव आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सोमवारी सकाळी स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील अधिकाऱ्यांना स्वॅब तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या महापालिका आयुक्तांनी आपली चाचणी करून घेतली आहे. त्यांचा अहवाल मात्र नेगेटिव आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन शिपाई आणि एक लिपिक यापूर्वीच कोरोना बाधीत झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास ५० हून अधिक कर्मचार्‍यांच्या तपासणी करण्यात आल्या. त्यात एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आला. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक कोरोना बाधीत असल्याने त्यांच्या संपर्कातून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना बाधा झाल्याचे दिसुन येते. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चाचणी केली त्याचे पॉझिटिव्ह त्यांच्यावर शल्यचिकित्सक डा२. निळकंठ भोसीकर यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

माझी तब्यत उत्तम आहे, तुम्ही सर्व काळजी घ्या

"कोविड-19 ची लक्षणे मला ता. ३१ ऑगस्ट रोजी लक्षात आल्याबरोबर मी रितसर विनाविलंब तपासणी करुन घेतली. यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक खबरदारी घेणे उचित समजून स्वत:हून आगोदर होम क्वारंटाइन झालो. काल सोमवार ३१ ऑगस्ट माझा आहवाल बाधित आल्याने आपल्या नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरु केले आहेत. माझी प्रकृती स्थिर असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर लवकरच यावर यशस्वी मात करून पुन्हा जोमाने काम सुरू करू" असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. आपण सर्वजण योग्य ती काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Dr. Vipin's coronation nanded news