जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला या धरणाचा आढावा

nnd10sgp04.jpg
nnd10sgp04.jpg

मुक्रमाबाद, (ता.मुखेड) : शासनाने मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्तांना मावेजा दिला नसल्यामुळे येथील लेंडी प्रकल्प गेल्या ३५ वर्षांपासून रखडला होता. पण जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी येथील प्रकल्पग्रस्तांच्या मावेजासह सर्व मागण्या पूर्ण होऊन येथील प्रकल्पग्रस्तांना अंतिम मावेजाच्या वाटपाला प्रत्यक्षात सुरवात झाली. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी शुक्रवारी (ता.नऊ) लेंडी प्रकल्पाला भेट देऊन उर्वरित कामांचा आढावा घेत मुक्रमाबाद येथे मावेजा वाटपाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व समस्या सोडवून माझ्याच काळात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


पुनर्वसनाचा कायमचा प्रश्न सुटला
मुक्रमाबादपासून काही अंतरावर असलेल्या गोणेगाव येथे लेंडी नदीवर १९८४ मध्ये महाराष्ट्र व तेलंगणा राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने लेंडी धरणाची उभारणी करण्यात आली. पण या धरणाला तालुक्यातील राजकारण्यांनी ग्रासल्यामुळेच ३५ वर्षांनंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. पण आता जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा व पुनर्वसनाचा कायमचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी पावले उचलली असून मुक्रमाबाद येथील एक हजार ३१० घरांचा मावेजा वाटपाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वाटपाला सुरवात करून घेतली. बांधीव असलेल्या बारा गावांतील नागरिकांचे पुनर्वसन, मावेजा यासह इतर नागरी सुविधांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लेंडी धरणाला प्रत्यक्ष भेट देत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व व्यथा जाणून घेतल्या.


प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या
मुक्रमाबाद येथे मावेजा चालू असलेल्या विश्रामगृहाला भेट देत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. उर्वरित अकरा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या असलेल्या समस्याही सोडविण्यात येणार असून यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या सकारात्मक बैठका घेण्यात येत आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, संतोषी देवकुळे, तहसीलदार काशीनाथ पाटील, वैष्णवी पाटील, लेंडी अभियंता आर. एम. पेशकार, मकरंद देवकर, तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर, सरपंच राजश्री आवडके, शिवराजआप्पा आवडके, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष बालाजी पसरगे, सुभाषअप्पा बोधने, राहुल इंदुरे, एस. जी. तोतरे, एम. डी. श्रीरामे, तलाठी फुसकुलवार, लोकरे, ग्रामविकास अधिकारी नागेश्वर, विस्तार अधिकारी देवकत्ते यांच्यासह सर्वच खात्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com