esakal | नांदेडला दिलासा : अबचलनगरच्या पहिल्या रुग्णाची कोरोनावर मात...  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अबचलनगर येथील कोरोना बाधीत रुग्णाने मात केली. त्याची प्रकृती ठणठणीत झाल्याने व सर्व तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्या चालक असलेल्या रुग्णाला आरोग्य विभाग व पोलिसांच्या वतीने टाळ्या वाजवून फुलांचा वर्षाव करत रुग्णालयातून मुक्तता केली.

नांदेडला दिलासा : अबचलनगरच्या पहिल्या रुग्णाची कोरोनावर मात...  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहर व जिल्ह्यात आपले पाय पसरणाऱ्या कोरोना या गंभीर आजारावर मात करत अबचलनगर येथील कोरोना बाधीत रुग्णाने मात केली. त्याची प्रकृती ठणठणीत झाल्याने व सर्व तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्या चालक असलेल्या रुग्णाला आरोग्य विभाग व पोलिसांच्या वतीने टाळ्या वाजवून फुलांचा वर्षाव करत रुग्णालयातून मुक्तता केली. तो रात्री उशिरा आपल्या परिवारात गेला. त्याच्या परिवारानेही त्याचे स्वागत करुन महिलांनी औक्षण केले. यावेळी सर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळत होते.  

नांदेड शहरात व ग्रामिण भागात कोरोणाचा उद्रेक होत आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही ६३ वर गेल्याने नांदेडकर भयभीत होत आहेत. शहरातील पहिला रुग्ण हा पीरबुऱ्हाननगर भागात आढळल्याने त्याच्यावर उपचार सुरू होता. या प्रकरणात प्रशासनाची धांदल उडत असतांना पंजाब येथे शिख भाविकांना आपल्या वाहनातून सोडून आलेल्या एका अबचलनगर येथील वाहन चालकाचा उपचारानंतर ता. २६ एप्रिल रोजी कोरोना तपासणी अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर अबचलनगर हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्या सहवासात आलेले तीन रुग्ण हे कोरोना बाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - ‘ग्राहक पंचायत’कडून कोरोनावर ऑनलाईन जनजागृती

आतापर्यंत नांदेडमध्ये ६३ रुग्ण आढळले

नांदेडमध्ये कोरोणा बाधित रुग्ण बरा होण्याची ही पहिलीच घटना असून नांदेडकरांसाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत नांदेडमध्ये ६३ रुग्ण आढळले असून पैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत. कोरोना बाधीत रुग्णांवर नांदेड आणि बारड येथे उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत अबचलनगर येथे पहिला आढळलेला रुग्ण पंजाब येथे जाऊन आला होता. त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर त्याची प्रकृती ठीक झाली असून आता त्याचे सर्व रिपोर्ट (अहवाल) निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला मंगळवारी (ता. १२) उशिरा रात्री घरी सोडण्यात आले आहे. 

मंगळवारी (ता. १२) पुन्हा दिवसभरात ११ पॉझिटीव्ह

एकीकडे एक रुग्ण बरा होऊन घरी जातो तोच पुन्हा ११ रुग्ण पॉझिटीव्ही सापडतात ही मात्र चिंतेची बाब आहे. अनेकांचे स्वॅब घेणे सुरू असून काही जणांचे अहवाल हे निगेटीव्ह येत असल्याने प्रशासन सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या या रुग्णाचे उपस्थित सर्वांनी टाळ्या व त्याच्या अंगावर पुष्पवृष्टी करुन त्याला घरी पाठविले. हा क्षण नांदेडकरांच्या स्मरणात राहणार आहे.  
 

loading image