

नांदेड - नांदेड शहराच्या नावावर गेली अनेक वर्षे केवळ राजकारण झाले; निधी आला, खर्चही झाला, मात्र अपेक्षित विकास मात्र झाला नाही. आता शहराचा सर्वांगीण आणि ठोस विकास करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.