नांदेड : शासनाला दरमहा ४० कोटी महसुल देणारी कंपनी बंद...कशामुळे ते वाचा?

file photo
file photo

धर्माबाद (जिल्हा नांदेड) : जिल्ह्यातील एकमेव सुरु असलेली व शासनाला दरमहा चाळीस कोटी रुपये महसुल देणाऱ्या पायोनीयर कंपनीतच कोरोनाचा शिरकाव झाल्याने हे युनीट बंद करण्यात आला आहे. येथील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने येथील उत्पादन युनीट बंद करणय्ात आले आहे. या कंपनीत ४०० कर्मचारी कार्यरत असुन सर्वांची अॅटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. याकडे स्वत: तहसिलदार व त्यांचे सहाकीर लक्ष ठेवून आहेत. 

धर्माबाद शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पायोनियर डिस्टिलरीज (मद्य तयार करणारी युनीट) कंपनीतील एका अधिकाऱ्यास कोरोनाचीलागण झाल्याचे बुधवारी (ता. २९) सकाळी उघडकीस येताच तहसील व आरोग्य प्रशासनाने तत्परता दाखवत कंपनीत धाव घेतली. लगेच ७० कर्मचाऱअयांची अॅटीनजेन रॅपीड टेस्ट करण्यास सुरुवात केली. या चाचणीत सायंकाळपर्यंत आणखी सात ज म्हणजे एकूण आठ जण बाधईत निघाले. तपासणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. 

एका अधिकार्‍याची बाधा अन्य कर्मचाऱ्यांना 

बहुचर्चित पायोनियर डिस्टिलरीज कंपनीत कार्यरत एका अधिकार्‍यास कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. हा अधिकारी कोरणा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाग्रस्त झाल्याची सांगण्यात आले. सदरचा अधिकारी हा अनेक कर्मचारी व कामगारांच्या संपर्कात आल्यामुळे कर्मचारी व कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच कंपनीत दुपारी तहसीलदार डी. एन. शिंदे हे आरोग्य पथकासह दाखल झाले. त्यामुळे कंपनीतील बॉटलिंग प्लांट बंद करण्यात आला आहे.

कंपनीत जवळपास ४०० जण कार्यरत 

कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांना तहसीलदार व आरोग्य यंत्रणेकडून ७० जणांची टेस्ट केली. कंपनीत जवळपास ४०० जण कार्यरत असून या सर्वांची तपासणी होणार आहे. बुधवारच्या चाचणीत अधिकारी वगळता आणखी सात जण कोरोनाग्रस्त आढळल्याची माहिती तहसीलदार श्री. शिंदे यांनी दिली. यावेळी गटविकास अधिकारी श्रिकांत बर्दे, पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासन हादरले आहे. येथील कोविड केअर सेंटरमार्फत बुधवारी २० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. येणाऱ्या अहवालाकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज 

तसेच दोन जणांचे कोरोना अहवाल प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यात ३३ बुधवारी सायंकाळी आढळले.  कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्री. शिंदे, आरोग्य अधीक्षक डॉक्टर शेख एकबाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खंदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वेणुगोपाल पंडित, श्री. कांबळे, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक बाबूराव केंद्रे, सफाई विभाग प्रमुख यांच्यासह अधिक कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com