
लोहा शहरातील जिल्हा उपविभागीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरुना रुग्ण प्रति दयाभाव दाखवत एबीसी ग्रुपचे अमोल चव्हाण यांनी गरजू रुग्णांना अन्नपुरवठा
कोरोना रुग्णांबाबत दयाभाव : लोहा येथील एबीसी ग्रुपचा मदतीचा हात
लोहा (जिल्हा नांदेड) : कोविड संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. जिकडे तिकडे रुग्णसंख्या वाढते आहे. अशा भीतीयुक्त वातावरणात रुग्णांप्रति दयाभाव दाखवून आरोग्य सुविधा देणारे एबीसी ग्रुपचे लोह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
लोहा शहरातील जिल्हा उपविभागीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरुना रुग्ण प्रति दयाभाव दाखवत एबीसी ग्रुपचे अमोल चव्हाण यांनी गरजू रुग्णांना अन्नपुरवठा विशेषतः सनीटायजर ,अंडी यासारख्या जीवनावश्यक वस्तू भेट दिल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.एबीसी ग्रुपने यापूर्वी पुणे, नांदेड,कंधार, दिल्ली येथील झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था व शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला होता.
हेही वाचा - इंडिका कारसह एक लाख चौदा हजाराची विदेशी दारू जप्त- मुदखेड पोलिसांची कारवाई
आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत आहेत
लोहा शहरात गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळा. हात धुवा. भरपूर पाणी प्या . भाजीपाला व फळे खा.' कोरणा हा आजार दुर्धर नाही, त्यावर मात करता येऊ शकते.' यासारखे जनजागरण एबीसी ग्रुपने प्रत्येक प्रभाग निहाय केल्यामुळे अल्पावधीतच या ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण आपल्याच लोकांना प्रोत्साहन नाही देणार तर कोणाला देणार? आज एबीसी ग्रुपने कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत आहेत.
विद्यार्थांना शाळेत लागणाऱ्या वस्तू ही दिल्या गेल्या
एबीसी ग्रुपने कोरोना च्या काळात, गरीब व गरजू लोकांना अन्न पुरवण्यापासून, मास्क देण्या पासून व लोकांमध्ये जन जागृती निर्माण केली. एवढंच न्हवे तर ह्या हलाखीच्या परिस्थितीत विद्यार्थांना शाळेत लागणाऱ्या वस्तू ही दिल्या गेल्या आहेत. रुग्णालयात अंडी, बिस्कीट, श्यानिटायजर स्वतः जाऊन देतात, आनंद वाटतो. आपल्या लोह्याच्या च जनतेसाठी मदतीचा हात देत आहेत. ह्यांचं अभिनंदन करणे हे माझं आणि माझ्या परिवाराच कर्तव्य आहे.
येथे क्लिक करा - ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील होते सदाबहार व्यक्तीमत्व
जीवनपध्दतीत बदल करा
"आजच्या ह्या बिकट परिस्थितीत आपण सर्व जण एकत्रित येऊन कोविड संसर्गजन्य आधारावर मात करता येते. जीवनपध्दतीत बदल करा. हा एक नवीन विचार आणला पाहिजे जो विचार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी असावा."
अमोल गायखर- सामाजिक कार्यकर्ते, लोहा.
संपादन - प्रल्हाद कांबळे
Web Title: Compassion Coronary Patients Abc Groups Helping Hand Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..