रोहित्र दुरुस्ती वेळेत पूर्ण करा....कोणी दिले आदेश ते वाचा 

NND26KJP01.jpg
NND26KJP01.jpg

नांदेड : महावितरणच्या वतीने येणाऱ्या मान्सुनची दखल घेत मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात नुकसान होते. त्यासाठी पावसाळ्याआधीच महावितरणने काम सुरू केले आहे. मान्सुनपुर्व कामांकडे दुर्लक्ष न करता सर्व कामे वेळेच्या आत पुर्ण करण्याचे निर्देश महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत.

रखरखत्या उन्हात काम सुरु
मान्सुन दाखल होण्याची चाहूल लागताच महावितरणने पावसाळापुर्व वीज वाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल दुरूस्तीची कामे महावितरणने हाती घेतली आहेत. तापमानात प्रचंड वाढ झालेली असतानाही तळपत्या व रखरखत्या उन्हामध्ये चटके सहन करत महावितरणचे जनमित्र उन्हाला न जुमानता करोनाच्या संकटातही सर्व तयारीनिशी दुरूस्तीच्या कामाला लागले आहेत.

विविध प्रकारची कामे सुरु 
पावसाळ्यामध्ये वीजग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा सातत्याने मिळावा याकरिता पावसाळ्यापुर्वी महावितरणच्यावतीने देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणार्‍या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. 

उपकेंद्राची दुरुस्ती 
यासोबतच उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, खराब झालेले कपॅसीटर बदलणे, आर्थिंग तपासणी करणे, लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरूस्त असल्यास नवीन लावणे, पॉवर ट्रान्सफॉर्मरची तेलाची पातळी तपासणे,ऑईल टॉपअप करणे, बॅटरीची सुस्थितीत ठेवणे, आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे, दुरूस्ती करणे. अशा प्रकारच्या विविध कामांचा समावेश या दुरूस्तीमध्ये आहे.

विज ग्राहकांसाठी संपर्क क्रमांक
खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदविण्यासाठी स्थानिक कंट्रोल रूम शिवाय महावितरणचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक २४ बाय ७ उपलब्ध आहेत. याचा वापर वीजग्राहकांनी करावा.


आपत्तकालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज
पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी यासोबतच खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे असे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत. सोबतच वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडीत झालेल्या काळात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com