Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या भाषणावेळी गोंधळ ; मुखेड तालुक्यातील जांबमध्ये मराठा आंदोलकांकडून आरक्षणाबद्दल विचारणा

भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच खासदार अशोक चव्हाण भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. १८) मुखेड तालुक्यातील जांब येथे आले होते. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला बळी पडावे लागले.
Ashok Chavan
Ashok Chavansakal

मुखेड : भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच खासदार अशोक चव्हाण भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. १८) मुखेड तालुक्यातील जांब येथे आले होते. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला बळी पडावे लागले. त्यांचे भाषण सुरू असतानाच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून जाब विचारला.

यामुळे सभेत तणाव निर्माण झाला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आमदार तुषार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुक्यातील जांब येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

जांब येथील प्रचारसभेच्या व्यासपीठावर खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांच्या समोरच मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोंधळ घातला.

Ashok Chavan
Nanded Loksabha Constituency : नांदेडमध्ये प्रचाराला उरले अवघे सहा दिवस

यावेळी त्यांनी अशोक चव्हाण भाषण करत असताना ‘आपण मराठा आरक्षणासंदर्भात गप्प का? मराठा समाजाला आरक्षण पाहिजे! एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी वेळीच परिस्थिती ओळखून तणाव शांत केला. यावेळी अशोक चव्हाण यांनी मराठा समाजबांधवांसोबत चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपले भाषण पूर्ण केले. यावेळी सकल मराठा समाजाचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com