esakal | कॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खबरदारी म्हणून त्यांनी आपल्या बाधीत कुटंबियासह औरंगाबादला उपचार घेण्याचे ठरविले. रविवारी (ता. २८) पहाटेच ते रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादाला पोहचले.

कॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाची लागन झालेले नांदेडचे आमदार व त्यांच्या संपर्कातून त्यांच्या कटुंबियातील नऊ सदस्याना कोरोनाची बाधा झाली. खबरदारी म्हणून त्यांनी आपल्या बाधीत कुटंबियासह औरंगाबादला उपचार घेण्याचे ठरविले. रविवारी (ता. २८) पहाटेच ते रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादाला पोहचले. त्यांच्यावर औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. 

कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील पाच बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३६५ बाधितांपैकी एकूण २७५ व्यक्ती कोरोनातून बरे झाले. शनिवार (ता. २७) रोजी रात्री नविन बाधीताची भर पडली.

हेही वाचा  आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा ​
आमदारांचे कुटुंबच बाधीत

नवीन बाधितांमध्ये विष्णुपुरी येथील आमदारांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचा समावेश होता.  शिवाजीनगर येथील ६२ वर्षाचा एक पुरुष, बोरबन परिसरातील ५५ वर्षाची एक महिला, गोकुळनगर येथील ५८ वर्षाची एक महिला, बिलालनगर येथील सहा वर्षाची एक मुलगी, नाथनगर येथील २२ वर्षाची एक महिला, भगतसिंघ रोड येथील ५२ वर्षाची एक महिला, पिरबुऱ्हानगर येथील १९ व २० वर्षाच्या दोन महिला व तिन वर्षाचा एक बालक, उमरकॉलनी येथील २८ व ६० वर्षाच्या दोन महिला, लेबरकॉलनी येथील ३४ वर्षाचा एक पुरुष, देगलूरनाका शिवनगर येथील ६४ वर्षाची एक महिला, नायगाव ताकबीड येथील ४४ वर्षाचा एक पुरुष, गॅस गोडाऊन लोहा येथील ५२ वर्षाची एक महिला व ५५ वर्षाचा एक पुरुष आणि चंद्रभागानगर कंधार येथील ४४ वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. 
 
औरंगाबादला तेरा तर सोलापूरला एकावर उपचार सुरू 

नांदेड जिल्ह्यात ५८ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३९, एक बाधित नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात, मुखेड कोविड केअर सेंटर येथे एक बाधित व्यक्ती उपचार घेत असून तेरा बाधित औरंगाबाद आणि एक बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. 

येथे क्लिक करा - व्हीसीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद, काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. विपीन...?

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.