
नांदेड ः जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे गेल्या दोन- तीन दिवसांपासून बाधीत रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मंगळवारी (ता. चार) प्राप्त झालेल्या दोन हजार ७७ अहवालापैकी एक हजार ४४ निगेटिव्ह, ४९० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनातुन मुक्त (Corona virus free) होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८७. ६७ टक्यावर आहे आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक (Good News) बाब असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. Consolation to Nandedkar on Tuesday; One thousand 44 patients corona free, 15 deaths
मंगळवारी एक हजार ४४ कोरोनाबाधित रुग्णांनी आजारावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७२ हजार ३०९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्यापैकी एक पुरुष व एक महिला, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील आठ पुरुष, दोन महिला, किनवट कोविड रुग्णालयात एक पुरुष आणि गोदावरी कोविड रुग्णालयात दोन पुरुष अशा एकूण १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एक हजार ६३९ बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
एकूण ४९० अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत
मंगळवारी नांदेड महापालिका क्षेत्रात- १७९, नांदेड ग्रामीण- २२, बिलोली- १०, हिमायतनगर-पाच, माहूर - १५, उमरी- १३, देगलूर- २७, कंधार- १७, मुदखेड-११, अर्धापूर- ३०, धर्माबाद- पाच, किनवट- ४१, मुखेड - पाच, भोकर- १४, हदगाव- १९, लोहा- २६, नायगाव- २०, मुखेड- एक तर बाहेर जिल्ह्यातील यवतमाळ- आठ, निझामाबाद- एक, परभणी- चार, हैदराबाद- एक, बीड- एक, लातूर- एक, हिंगोली- आठ असे एकूण ४९० अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
२१५ बाधितांची प्रकृती गंभीर
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ४७६ इतकी झाली असून, त्यापैकी ७२ हजार ३०९ रुग्ण कोरोनामुक्त तर एक हजार ६३९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या आठ हजार २६३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत त्यापैकी २१५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड कोरोना मीटर ः
एकूण पॉझिटिव्ह ः ८२ हजार ४७६
एकूण कोरोनामुक्त ः ७२ हजार ३०९
एकूण मृत्यू ः एक हजार ६३९
मंगळवारी पॉझिटिव्ह ः ४९०
मंगळवारी कोरोनामुक्त ः एक हजार ४४
मंगळवारी मृत्यू ः १५
उपचार सुरु ः आठ हजार २६३
गंभीर रुग्ण ः २१५
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.