विधायक बातमी : भोकरमध्ये हुंडा न घेता लग्नसंबंध जोडून साखरपूडा उरकला 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 13 January 2021

मोठा हुंडा दिल्याशिवाय लग्न होत नाही असा समज आहे. परंतु कऱ्हे आणि केशवे यांनी याला बगल देत बिना हुंडा लग्न संबंध जुळवून आणला. याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. 

नांदेड : सध्या मुलीचे लग्न करणे म्हणजे मुलीच्या पालकांवर आलेले मोठे संकट आल्यासारखे वाटते. पंरतु आजही काही पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठी मोठ्या ताकदीने कष्ट करुन लग्न पार पाडता. लग्नात मोठा हुंडा दिल्याशिवाय लग्न होत नाही असा समज आहे. परंतु कऱ्हे आणि केशवे यांनी याला बगल देत बिना हुंडा लग्न संबंध जुळवून आणला. याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. 

मोहनराव कर्हे बिटरगावकर रा. वरुड ता. कळमनूरी यांचे चिरंजीव केशवराव व श्री अरुण किशवे पाटिल रा. हाळदा ता. भोकर यांची कन्या मयूरी यांचा बुधवारी (ता. १३) साखरपूडा संपन्न झाला.

सामाजिक परिवर्तनाच्या व रुढी परंपरेला छेद दिला
    
सध्याच्या काळात सगळीकडे समाजात लग्नाचे सोईरसंबध जुळवायचे म्हटले की वधू पित्याकडून रग्गड मोठ्या प्रमाणात हुंडा व इतर देणगी वेगवेगळ्या मागन्या घालून वधू-वरांचे सोयरिक लग्न संबंध जुळले जातात. पण या सर्व रुढी परंपरेला व समाजातिल हुंडा पध्दतीला छेद देत वर पिता मोहनराव कऱ्हे यांनी समाजापूढे आदर्श निर्माण करत कसल्याही प्रकारचा हुंडा किंवा वधू पित्याकडून देणगी न घेता लग्नाचे होईल संबंध जुळवले व कोणताही बडेजाव न करता साखरपूडा व शाल- अंगठी कार्यक्रम करण्यात आला. त्यामूळे मोहनराव कऱ्हे सामाजिक परिवर्तनाच्या व रुढी परंपरेला छेद दिला. त्यांच्या या भुमिकेचे सर्वत्र कौतूक होत आहे. या प्रसंगी यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमूख नागोराव शेंडगे बापू यांनी महत्त्वाची भूमिका बजावत हे कार्य घडवून आणले. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिष्टित नागरिक, आप्तस्वकिय मंडळी हजर होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constructive news: In Bhokar, without taking a dowry, the was added by adding marriage nanded news