esakal | विधायक बातमी : नांदेडच्या कुंभारवाडी नदीवरील लोकसहभागातून उभारलेल्या पुलाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दहा वर्षापासून बंद असलेला रस्ता पुन्हा सुरु झाला; बाळासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

विधायक बातमी : नांदेडच्या कुंभारवाडी नदीवरील लोकसहभागातून उभारलेल्या पुलाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : बारड गावच्या पश्चिम दिशेस असलेल्या कुंभारवाडी नदीवरती बारड ग्रामपंचायत व गावचे शेतकरी नागरिक यांनी संयुक्तपणे लोकसहभागातून हनुमान सेतू नामक पुलाचे बांधकाम केले असून रविवारी (ता. १४) लोकार्पण सोहळा शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक मारोतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

बारड (ता. मुदखेड) येथील तीन समाजाच्या स्मशानभूमीस जोडणारा व गावातील अनेक नागरिकांच्या शेतीला जाण्यासाठी असलेला जवळचा रस्ता म्हणजेच कुंभारवाडी नदी ओलांडणारा रस्ता मागील दहा वर्षापासून पूल नसल्याने बंद होता हा रस्ता कुंभारवाडी नदीवर पुलाचे बांधकाम करून चालू करण्यासाठी शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी गावकरी व ग्रामपंचायत यांच्या सहभागातून पूल बांधकाम करण्यात आले व हा रस्ता तब्बल दहा वर्षानंतर चालू झाला आहे.

बारड गावच्या पश्चिम दिशेस एक नदी असून या नदीपलीकडे बारड येथील कुंभार समाज, मराठा देशमुख समाज व मराठा रावसाहेब समाज यांच्या स्मशान भूमी असून या स्मशानभूमीमध्ये प्रेत नेण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर दूरवरुन जावे लागत असे. याच भागामध्ये बारड येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असल्यामुळे या शेतकऱ्यांना देखील शेताकडे ये- जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे.

नदीला पाणी आल्याने पाच किलोमीटर दुरुन जावे लागत असे आता या कुंभारवाडी नदीवरती ग्रामपंचायत व गावातील शेतकरी नागरिक यांच्या सहभागातून हनुमान सेतू नामक पुलाचे बांधकाम करण्यात आले. यामुळे बारड येथील शेतकरी व नागरिकांना आता पाच ते सहा किलोमीटर अंतर दुरुन न जाता अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर त्यांच्या शेती व स्मशानभूमी आल्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

रविवारी (ता. १४) रोजी कुंभारवाडी नदीवर येथील शेतकरी, शेतमजूर, महिला मजूर याना पाई जाण्यासाठी हनुमान शेतु (लोखंडी पूल ) बांधण्यात आला. या हनुमान सेतू पुलाचे उदघाटन गावचे जेष्ठ नागरिक मारोतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामजी बागडे हे होते. ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमीन दिली असे केशव देशमुख व गीलताई यांचा सत्कार करण्यात आला. या वेळेस बारडचे सरपंच प्रभाकरराव आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी टिप्परसे, रोहिनी कवळे, ग्रा. प. सदस्य विलासराव देशमुख, माणिकराव लोमटे, गजानन कत्रे, प्रदीप देशमुख, तसेच गावातील जेष्ठ नागरिक रघुनाथराव देशमुख, वसंतराव देशमुख, किशोरराव देशमुख, गावचे पोलिस पाटील यशवंतराव लोमटे, माधवराव भीमेवार, प्रभाकर भीमेवार, बालाजी आंबरे, काशीनाथ मुलंगे, नामदेव उपवार, विश्वनाथ सूर्यवंशी, मोहनराव दादाराव कवळे, दिगंबरराव टिपरसे, अशोकराव देशमुख, गोपाळराव देशमुख आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बाळासाहेब देशमुख बारडकर व माजी उपसरपंच गोपाळ देशमुख बारडकर यांनी हा पूल उभारण्यासाठी सहभाग नोंदवला. त्या शेतकऱ्यांचे व ग्रामपंचायतचे आभार मानले ग्रामपंचायत बारडच्या माध्यमातून बारड गावचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न करीत राहील, गावातील नागरिकांना नागरी समस्या उद्भवू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी बाळासाहेब देशमुख यांनी दिली.
हनुमान सेतू या पुलाचा लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी बारड येथील संदीप देशमुख, गणेश आठवले, भन्तु आठवले, दिगंबरराव टिप्परसे, मारोती कांबळे, किरण महाजन, विजय देशमुख, शरद कवळे, राजेश लोणे, बाळू महाराज, सिध्दोधन आठवले,  कैलास फुलकुंठवार, दौलत मिस्त्री, बाबुराव लोमटे, सदाशिव तांडे, रत्नपारखी सर, सुनिल कणसे, नितीन जैस्वाल आदींसह शेतकरी नागरिकांनी प्रयत्न केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image