विधायक बातमी : वृत्तपत्र विक्रेत्या हदगावच्या महिलेला आशादीप ग्रुपकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हदगाव येथील बसस्थानक परिसरात वृत्तपत्रे विक्रेत्या महीलेला आशादिप ग्रुपकडून जिवनाश्यक वस्तूची मदत, लॉकडाउन काळात मदत ठरतय बहूमुल्य

विधायक बातमी : वृत्तपत्र विक्रेत्या हदगावच्या महिलेला आशादीप ग्रुपकडून मदत

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : प्रत्येक व्यक्तीने निवडलेल्या क्षेत्रात काम करत असताना अचानक काम बंद झाल्यानंतर पुढील व्यवहार करताना काय अडचण येते ते सर्वानाच माहीत आहे. असाच प्रकार हदगांव बसस्थानक परिसरात विविध वृत्तपत्रे विक्रेत्या म्हणून काम करत असलेल्या श्रीमती वाठोरेबाई यांचे उदरनिर्वाह वृत्तपत्र विकुन चालवत होत्या. मात्र गेल्या एक वर्षापासून कोरोना आजारामुळे वेळोवेळी संचारबंदी लागू करण्यात येत असल्याने वृत्तपत्र विक्रेता व्यवसाय अडचणीत सापडला असल्याने दुसरा पर्याय नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत होता.

समाजात जगत असताना समाजाचे काही देणे लागते या उदात्त हेतूने एकविचाराने असलेल्या कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी गेल्या काही महिन्यांपासून आशादीप ग्रुप तयार करुन प्रति महिना दोनशे रुपये व आपल्या संकल्पनेनुसार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जिवन जगत असलेल्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी जिथं अडचण तिथे मदतीसाठी जमेल ती मदत केली जात आहे. ता. २८ रोजी रविवारी वाठोरेबाई यांना जिवनावश्यक वस्तू मदत किट घरपोच दिली.

हेही वाचा - 'कोरोना योध्दा विद्यापीठ' नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

हदगांव येथीलच कौशल्याबाई संजय कांबळे या गरीब महिलेला किराणा किट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. लॉकडाउनच्या काळात गरीब कुटूंबाच्या हाताला काम नाही त्यामुळे उपासमारीची वेळ अनेक कुटूंबावर आली आहे. याच लॉक डाऊनच्या काळात जिवांकूर ग्रुपची मदत ठरत आहे बहूमुल्याची. यावेळी आशादिप ग्रुपचे सदस्य हरीचद्रं चिल्लोरे, सतीश खानसुळे, कृषी तंत्र व्यवस्थापक हदगाव, विठ्ठल पंडीत, दिलीप नवसागरे, पत्रकार अब्दुल्ला चाऊस, प्रभाकर दहीभाते उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Constructive News Help Ashadeep Group Newspaper Vendor Hadgaon Woman Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedHadgaon