विधायक बातमी : लोकसहभागातून तयार होणारा " पुल " पूर्णत्वाकडे " एकीचे बळ " चे ज्वलंत उदाहरण

बंडू माटाळकर
Monday, 30 November 2020

ही बाब लक्षात घेऊन आणि शासन तर तात्पूर्ता पुलाकरीता निधी देणार नाही. मग या लोकांची अडचण कशी दुर करायची म्हणून त्यांनी लोकसहभागातून तात्पूर्ता पुल निर्माण करायचे ठरवले. याला लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने तळणी, साप्ती, काळेश्वर असे तीन पुलाचे बांधकाम झाले. यामुळे शेजारील गावाची अडचण दुर झाली.

निवघाबाजार ( ता. हदगाव जिल्हा नांदेड) : एकीच्या बळाने काय होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मनुला- पळशी दरम्यान पैनगंगा नदीवर लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या पुलाचे देता येईल. अवघ्या पंधरा दिवसात पुलाचे काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम यांनी याच पैनगंगा नदीवर नदीच्या दोन्ही बाजूकडील गावांना ये- जा करण्यासाठी मोठी अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन आणि शासन तर तात्पूर्ता पुलाकरीता निधी देणार नाही. मग या लोकांची अडचण कशी दुर करायची म्हणून त्यांनी लोकसहभागातून तात्पूर्ता पुल निर्माण करायचे ठरवले. याला लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने तळणी, साप्ती, काळेश्वर असे तीन पुलाचे बांधकाम झाले. यामुळे शेजारील गावाची अडचण दुर झाली.

मनुला ते पळशी येथील पैनगंगा नदीवर पुल होणे गरजेचे होते. या पुलाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित आहे. पण अद्याप शासनाने या पुलाच्या बांधकामाकडे लक्ष दिले नाही. यामुळे पावसाळ्यात परीसरातीत ग्रामस्थांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत होते. तर शालेय विद्यार्थ्याना नदीच्या पाण्यातून वाट काढत विदर्भातील पळशी येथे शाळेत जावे लागत होते. मनुला, माटाळा येथून केवळ विदर्भातील तालुक्याचे व मोठी बाजारपेठ असलेले उमरखेड हे ठिकाण अवघे दहा कि. मी. अंतरावर आहे. पण नदीवर पुल नसल्याने ३५ कि. मी.चा फेरा मारुन उमरखेड गाठावे लागते.

हेही वाचा -  Success story:पळसा येथील शेतकऱ्याने एक हेक्टर शेतीत रोपवाटिका व फळबागेतुन घेतले चांगले उत्पन्न -

बारा लाखामध्ये झालेल्या पुलामुळे अनेक गावांचा संपर्क येणार

यामुळे चितांगराव कदम यांनी लोकसहभागातून पुल निर्मिती करण्याचे ठरवले. अवघ्या पंधरा दिवसात बारा लक्ष रुपये लोक निधी जमला व पुलाचे काम केवळ आठ दिवसात पूर्ण झाले आहे. मनुला, माटाळा, शिरड, पेवा, कोहळी, साप्ती, काळेश्वर, येळब, करोडी, निवघा ( बा .) पळशी, पोफाळी, दिवटपिपरी आदी गावातील नागरीकांनी सढळ हाताने आर्थीक मदत दिली. तर उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे व हदगावचे आमदार माधवराव पाटील यांनी दोन्ही बाजूकडील जोड रस्त्यांच्या डांबरीकरणाकरीता लागणारा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 

यांनी केली सढळ हाताने मदत

तर हिंगोली लोकसभेच खासदार हेमंत पाटील यांनी पुलाच्या कामास भेट देऊन तिस हजार रुपये देऊन समाधान व्यक्त केले. आ. माधवराव पाटील यांनी ५१ हजार रुपयांची आर्थीक मदत केली. सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यानी पन्नास हजाराची मदत दिली. पुसद येथील कार्यकारी अभियंता श्री. लाखानी यानी पंचविस हजार मदत दिली. तर मनुला येथील जमिन नसलेला व टेलरचे काम करणारा युवक संतोष मारोतराव जाधव यानी पाच हजार १०० रुपये दिल्याचा उल्लेख चितांगराव यांनी सांगितले. ता. १० डिसेंबरपासून या पुलाचे लोकार्पण होणार असल्याचे चितांगराव कदम यांनी सांगीतले. सुदर्शन जाधव, गजानन जाधव, सुभाषजाधव, संजय कल्याणकर, प्रेमानंद पाटील, दिलीप बोरकर, डॉ. विश्वास जाधव, शिवाजी महाराज, गजानन सोळंके, विश्वभर कदम, कैलास यनकर, सतिष नाईक इत्यादीनी लोकसहभागातून निधी गोळा करण्याकरीता खूप परीश्रम घेतले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constructive News: A vivid example of the "strength of unity" towards "perfection" created through public participation nanded news