विधायक : कुंभार समाजातील कारागिरांना ईलेक्ट्रिक चाके प्रदान 

प्रल्हाद कांबळे
Monday, 2 November 2020

कुंभार समाज सशक्तीकरण मिशन अंतर्गत कुंभार काम करणाऱ्या कारागिरांचे दहा दिवसाचे निवासी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना इलेक्ट्रीक चाके प्रदान करण्यात आले. 

नांदेड : अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य आणि स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २८) ऑक्टोबर रोजी कै. दिगांबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय लहान (ता.अर्धापुर) येथे आयोजित कुंभार समाज सशक्तीकरण मिशन अंतर्गत कुंभार काम करणाऱ्या कारागिरांचे दहा दिवसाचे निवासी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना इलेक्ट्रीक चाके प्रदान करण्यात आले. 

कुंभार कारागिरांनी दहा दिवसात विविध दोनशे कला शिकण्याचा अनुभव घेतला. व ते शिकविण्यासाठी खास नाशिक येथुन प्रशिक्षक बोलाविले होते. त्यात दादासाहेब शिरसाठ, नानासाहेब शिरसाठ, सुनिल शिरसाठ यांचा समावेश होता. प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या समाज बांधवाना ईलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आले. सर्व प्रथम विनयकुमार सक्सेना (खादी ग्रामोद्योग मुंबईचे चेअरमन) यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे द्वीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात. सुरवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व उपस्थित कुंभार समाजातील कारागीर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. प्रस्तावना विजय देवडे यानी जिल्ह्यातील संघटनेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जिल्ह्यातील जनगणना, समाजाचे मेळावे, काकांच्या मंदिरासाठी विक्री घेतलेला प्लॉट, शहरात समाजाची काढलेली रॅली, सोळा तालुक्यात संघटनेचे जवळपास एक हजार पदाधिकारी नेमले, समाजासाठी मोर्चे व वेळोवेळी प्रशासनास निवेदन देणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे समाजातील गुणवंताचा सत्कार कार्यक्रम घेणे, असे समाजउपयोगी कार्यक्रम राबवत असल्याबाबत सांगितले.

हेही वाचा -  दिव्यांगांचे आजचे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव -

दत्ताजी डाळजकर म्हणाले की 

गेल्या सतर वर्षात कुंभार कारागिराना काही मिळाले नाही. परंतु आज साठ चाके मिळाली येवढ्यावर न थांबता अजुन चाकांची मागणी करुन उर्वरित कारागिराना उपलब्ध करुन देऊ. नांदेड जिल्ह्यात कल्सटर ही योजना राबवण्याचे अश्वासन दिले. त्यात जवळपास तिनशे कुंभार कारागीर एकत्र येउन काम करु शकतात. एक प्रकारची कंपनीच असुन तिनशे कुटुंबाना त्यातुन रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे त्यानी सांगितले. आणि ज्या काही राज्य व केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या आपल्या पर्यंत पोचवण्याचे काम करु असे सांगितले.

यांची होती उपस्थिती व मार्गदर्शन

यावेळी कुंभार कारागिरांपैकी श्रीकांत शिरोळे व रामचंद्र परडे या दोघानी दहा दिवसाच्या प्रशिक्षणाचा अनुभव सांगितला. इलेक्ट्रिक चाकामुळे वेळ वाचेल श्रम कमी लागतील आणि काम ज्यास्तीचे होऊन उत्पनात नक्कीच वाढ होईल. अशि ईच्छा व्यक्त केली. ए. एल. मीना, राजीव खन्ना, एस.व्ही. शिवशरण, पी. डी. शिंदे, मोहनरावजी जगदाळे, शामसेठ राजे, विश्वनाथराव कोलमकर, ज्ञानेश्वरजी भागवत, नंदुशेठ कुंभार, व्यंकटराव गोरगीळे, नंदकुमार संगापुरे, बाळासाहेब कुंभार, विजयराव देवडे, श्रीरामजी तेलंग, शंकरराव नांदेडकर, शिवाजी पांगरेकर, बालाजी घुमलवाड, लक्ष्मण विभुते, संदिप अवनुरे, कविताताई राजे, काळेश्वर देवडे, शंकरराव ईजगीरवाड, रमेशरावजी देगावकर, बालाजी जोरूळे, बालाजिराव ईबितदार, हभप राम महाराज पांगरेकर, दत्ताहरी कानगुलकर, ॲड. कृष्णा सोनुले, बालाजीराव पाशावार, विजयकुमार वादे, शंकरराव कुर्णापल्ले, डी. आय. मरकंटे, बालाजी टिमकिकर, लक्ष्मणराव शिरोळे, साईनाथ शिरपुरे, प्रविण कानघुले, संतोष पंदिलवाड, धोंडिबा गोत्रम, नरहारी चौकटे, शारदाताई देवडे, छायाताई कानघुले, बालाजी कुर्णापले, विठल आचार्य, गंगाधर राजरवाड, बाबु देवडे किवळेकर, रामदास देवडे, गिरिश बिचकुंदे, लक्ष्मण कोरंटलु, तुकाराम तेलंग, गणेश येरपेवार, मारोती नागपुरे, हणमंत कानगुले आदी पदाधिकारी व नांदेड जिल्ह्यातील कुंभार समाज उपस्थित होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constructor: Providing electric wheels to the potters nanded news