file photo
file photo

वीजग्राहकांनी मोबाईल ॲप व्दारे मीटर रिडींग पाठवावे- महावितरण

नांदेड :  लॉकडाऊन शिथील होताच महावितरणने कोवीड-19 चे प्रतिबंधीत क्षेत्र वगळता वीजमीटर रिडींग घेणे व वीजबिलांचे वाटप सुरू केलेले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे जे वीजग्राहक स्मार्ट मोबाईलचा वापर करत आहेत अशा वीजग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अॅप डाऊनलोड करून ॲपच्या सहाय्याने स्वत: मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभ्रियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

नांदेड परिमंडळामधील 7 लाख 84 हजार 207 वीजग्राहकांनी महावितरणच्या यंत्रणे मध्ये आपले मोबाईल्‍ क्रमांक नोंदवलेले आहेत. सध्या शहरी भागातील ग्राहकांसोबतच ग्रामीण भागातील ग्राहकही स्मार्ट मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण टाळण्याच्या हेतूने वीजग्राहकांनी मोबाईल ॲप व्दारे आपले मीटर रिडींग पाठवावे.

मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात

 लॉकडाऊनच्या दुसऱ्या सत्रात महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नांदेड परिमंडळातील 7 हजार 348 वीजग्राहकांनी एप्रिल महिन्याचे मीटर रिडींग मोबाईल ॲपव्दारे पाठवले होते. ऑगस्ट महिन्यातही आजपर्यंत एक हजार 994 वीजग्राहकांनी आपले मीटर रिडींग ॲपव्दारे पाठवलेले आहे. वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. त्यानुसार वीजग्राहकांनी दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपव्दारे आपल्या मीटरचे रिडींग व मीटरचा फोटो अपलोड करून पाठवावा.

आपले मीटर रिडींग अपलोड करून महावितरणला सहकार्य करावे

महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येणाऱ्या या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करणे शक्य झाले आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व अॅपवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त वीजग्राहकांनी या सुवीधेचा लाभ घेत आपले मीटर रिडींग अपलोड करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com