कोरोनात प्रशासनाला मिळत आहे ‘या’ वाहनाची साध...कोणत्या ते वाचा

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्हा समन्वयक डॉ. सुनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णवाहिकेद्वारे जवळपास तीन हजार संशयीत तर एक हजार कोरोना बाधीत रुग्णांची ने- आण करण्यात आली.

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या रुग्णवाहिकांपैकी ‘108’ रुग्णवाहिकेने कोरोनाच्या काळात अत्यंत महत्वाची भुमिका वठवली. जिल्हा समन्वयक डॉ. सुनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णवाहिकेद्वारे जवळपास तीन हजार संशयीत तर एक हजार कोरोना बाधीत रुग्णांची ने- आण करण्यात आली. या महत्वाच्या काळात ही रुग्णवाहिका सेवा खऱ्या अर्थाने प्रशासनाच्या मदतीला धावली. 

नांदेड शहर व जिल्ह्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे कोरना बाधित किंवा संशयित रुग्णांना कॉल सेंटर पर्यंत पोहोचविण्याचे काम ‘108’ या रुग्णवाहिकांनी पूर्ण केले आहे. मार्चपासून ही अविरत सेवा सुरु आहे. दरम्यानच्या काळात दोन हजार ८२१ रग्ण जे की संशीयीत आहेत. अशा रुग्णांना त्यांच्या घरापासून ते कोवीड सेंटर सो की. रुग्णालय असो या ठिकाणी वेळेत पोहविण्याचे काम केले. याचा लाभ सर्वाधीक गंभीर रुग्णांना झाला. त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचु शकले. 

संशयितांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ‘१०८’ मदत

देशात मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. चौथ्या लॉकडाउन दरम्यान नागरिकांना थोडी शिथिलता देण्यात आली. या कालावधीत कोरोना बाधित रुग्ण संशयितांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ‘१०८’ मदत महत्त्वाची ठरली. ग्रामीण भागात बऱ्याच वेळी रुग्ण वातावरणामुळे रुग्णवाहिकेतून प्रवास करण्यास तयार होत नाहीत. परंतु त्यांना दिलेल्या आत्मविश्वास व दिलासा आधारावर वैद्यकीय अधिकारी व चालकाने योग्य भूमिका निभावून कीट परिधान करून कोवीड सेंटरपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.

हेही वाचानांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण

पाच वर्षाचे बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सेवा

यामध्ये पाच वर्षाचे बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सेवा देण्यात आली. अशा लोकांना सहारा देऊन उपचारासाठी घेऊन जात आहेत. रुग्णालयातील सुट्टीनंतर यांच्या परिवाराची भेट घालून देईपर्यंत जबाबदारी पार पाडली. आज पावेतो दोन हजार ८२१ संशयित तर एक हजार कोरोना बाधितांची रुग्णवाहिकांनी सेवा केली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि जिल्हा समन्वयक डॉ. सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Corona the administration got the means of this vehicle read it nanded news