esakal | कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

मागील ४८ तासांत ९३ बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५४१ इतकी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ३५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी १३ तर रात्री आठ वाजता १७ असे एकूण दिवसभरात तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, विजयनगर येथील ७५ वर्षांच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

मागील ४८ तासांत ९३ बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५४१ इतकी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ३५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ.भोसीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात गुरुवारी (ता.नऊ) सायंकाळी ११२ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात ९० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह तर १३ स्वॅब पॉझिटिव्ह आले. 

हेही वाचा- उमरी खूनप्रकरण : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, दोघांनाही केले अटक

१६४ रुग्णांवर उपचार सुरू

बाधित रुग्णांपैकी देगलूर नाका (वय २५) पुरुष, वाघी (२५) महिला, नाथनगर मुखेड (सहा महिने) बालक व एक महिला (३१) आणि मुखेड येथील एक (३३) पुरुष या पाच व्यक्तींचा अहवाल बुधवारी (ता.आठ) मध्यरात्री तर, चाळीसगाव (३०) पुरुष, लक्ष्मीनगर येथील (वय २४, २७ व ४५) तीन महिला, नवीन हस्सापूर (४५) महिला, मोहसीन कॉलनी (४७) महिला, धनगरटेकडी (वय ४२, ४५) दोन पुरुष या आठ बाधितांचा गुरुवारी अहवाल प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात १६४ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील १८ रुग्ण यामध्ये १० महिला व आठ पुरुष यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची असून गुरुवारी सापडलेल्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व कुटुंबातील २४८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील हॉटेल, अतिथीगृह व लॉज सुरू ​

सासुबाई आल्या तेही कोरोना घेऊनच 

मुदखेडच्या ईडली सेंटर चालकाने काही दिवसांपूर्वी आपल्या सासूला हैदराबादहून खासगी टॅक्सीने मुदखेड येथे आणले होते. दरम्यान, दोन दिवसांनी सासुबाईची तब्येत बिघडल्याने त्यांना मुदखेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने स्वॅब तपासणी केली असता, तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सासुबाई पाठोपाठ मुदखेडच्या डॉक्टरांसह, १४ जणांना क्वारंटाइन व्हावे लागले. यामुळे डॉक्टर, टॅक्सीचालक, एक फार्मासिस्ट व राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाइकांसह जवळपास ७० जणांना मुदखेडच्या कोविड रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले. असे मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कपिल जाधव यांनी सकाळशी बोलताना सांगितले.