कोरोना ब्रेकिंग : रविवारी ७२ रुग्ण बाधित तर आतापर्यंत ६९३ रुग्णांने कोरोनाला हरविले 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 26 July 2020

जिल्ह्यातील आज २१ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २६ जुलै मोहम्मदनगर भोकर येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

नांदेड : जिल्ह्यात रविवार (ता. २६) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ७२ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज २१ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २६ जुलै मोहम्मदनगर भोकर येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ६४ एवढी झाली आहे. यात ५७ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण २४३ अहवालापैकी १६१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार ३२४ एवढी झाली आहे. यातील ६९३ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ५६२ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात चार महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या २१ बाधितांमध्ये कै. डाॅ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी पाच, खासगी रुग्णालयातील चार, बिलोली दोन, कंधार दोन, मुखेड दोन, नायगाव पाच, गोकुंदा एका बाधिताचा यात समावेश आहे.

हेही वाचा धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील पंचायत समिती परिसर एक, इतवारा एक, काबरानगर एक, शिवशक्तीनगर १०, एसपी आॅफीस परिसर एक, पाठकगल्ली तीन, कलामंदीर एक, एमजीएम काॅलेज परिसर एक, विजय लिला आशीर्वाद गार्डनसमोर एक, मीलगेट एक, महाविर सोसायटी एक, जुना कौठा तीन, हडको एक, सिडको एक, चौफाळा एक, सगरोळी बिलोली एक, मोहम्मदनगर भोकर एक, हदगाव दोन, तामसा चार, बिके हाॅल श्रीनगर दोन, शारदानगर देगलूर दोन, मोची गल्ली देगलुर एक, रफीक काॅलनी देगलुर एक, सत्यमनगर देगलूर एक, हाजीपुरा कंधार एक, जुना मोंढा नायगाव एक, कोलंबी     ता. नायगाव एक, मोंढा रोड धर्माबाद एक, देवी गल्ली धर्माबाद दोन, फुलेनगर मुखेड दोन, धोबी गल्ली मुखेड पाच, शिवाजीनगर मुखेड दोन, अंबुलगा मुखेड दोन, वडगाव मुखेड दोन, जाहूर मुखेड तीन, संत गाडगेबाबानगर मुखेड एक, खरबखंडगाव ता. मुखेड एक, बर्बीड ता. पूर्णा एक आणि गंगाखेड जिल्हा परभणी एक.

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ५६२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १०४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २१३, नायगाव कोविड केअर सेंटर येथे आठ, जिल्हा रुग्णालय येथे २७, बिलोली कोविड केअर सेंटर येथे तीन, मुखेड कोविड     केअर सेंटर येथे ७७, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ३२, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर नऊ, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे एक, लोहा कोविड केअर सेंटर येथे १०, कंधार कोविड केअर सेंटर येथे आठ, भोकर एक, धर्माबाद आठ, खाजगी रुग्णालयात ४५ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक करा - जिल्हा परिषदेतील अखेर बदल्यांना ब्रेक, अनेकांच्या अपेक्षाभंग

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ५२२
घेतलेले स्वॅब- १२ हजार २८१
निगेटिव्ह स्वॅब- ९ हजार ८१४
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ७२
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १३२४
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-८
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-१
मृत्यू संख्या- ६४ (जिल्ह्यातील ५७ तर बाहेर जिल्ह्यातील सात)
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ६९३,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ५६२
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३०९.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: 72 patients were infected on Sunday and so far 693 patients have lost corona nanded news